WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Monday, October 11, 2021

पुस्तक: सत्तर दिवस

जगण्याचं बळ  कोठून येत?

 ७० दिवस बर्फाच्या पर्वतावर अन्न पाण्या शिवाय! 

१६ लोक जे विमान अपघातातून वाचले त्यांची हे खिळवून ठेवणारं पुस्तक! पुस्तक नव्हे ही जगण्याची जिद्द निर्माण करणारे टॉनिक आहे! 

 पुस्तक: सत्तर दिवस  -

लेखक: रविंद्र गुर्जर

प्रकाशन: श्रीराम एजन्सी

पृष्ठ: २०० मूल्य:२०० टपाल खर्च:३०/

संपर्क: 9421605019 वर व्हॉटसअप करून संपर्क साधावा.

एका वाचकाची प्रतिक्रिया!

12 ऑक्टोबर1972
युरग्वे एयर फोर्सेच्या फेयर चाइल्ड 227 ह्या विमानाणं 45 प्रवाश्या सह आकाशात झेप घेतली.
रग्बी खेळाडूंचा हौशी संघ चिलिकडे निघाला होता, अँडीज पर्वत ओलांडून त्यांना यायचं होतं..

अँडीज म्हणजे हिमालया एवढाच पर्वत समूह, त्यावरून फेयर चाइल्ड विमान जात असताना अचानक ते ढगात शिरतं, हिम् वर्षाव चालू असल्याने झंजावती वाऱ्याचे दोन प्रचंड तड़ाखे विमानाला बसतात, आणि विमान खाली कोसळतं..
विमानातील 45 जनापैकी वाचलेल्या 16 लोकांनी सांगितलेली त्यांच्या 70 दिवसाची ही थरारक सत्यकथा..

 मन सुन्न करून टाकनारी  कादंबरी..

वाचताना माणसाच्या भावना आणि मनाला चिरुन टाकनारे काही प्रसंग डोळ्या समोर उभे राहतात..
विमानातील त्या 45 लोकांच्या मनात आणंदाचं उधान आलं होतं , काही एकमेकां सोबत गप्पा मारताना तर काही जन आपल्या स्वप्नात आपल्या प्रियशी सोबत रमलेले, तर काही जन रुग्बी फुटबॉल मधे जिंकल्याचे स्वज्वळ विचारात गुंग झालेले ..

              पण नियती किती कठोर असते, त्यांच्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या जीवनात अचानक अंधार व्हावा, त्यांच्या स्वप्नाचे किरण त्या अंधारात कायमचेच बुडावे असं घड़लं, त्याचं विमान एंडीज पर्वतात खोल दरित कोसळलं होतं..
एंडीज म्हणजे हिमालयाच्या बरोबरिचा पर्वत. त्या पर्वतावरिल चार ही बाजूने बर्फाची झालेली शिखरे, ते भव्य आणि उद्दात्त दर्शन म्हणजे प्रचंड भीतिदायक ..

त्या 70 दिवसातील प्रत्येक दिवस म्हणजे मृत्यूच्या दारात उभा असल्याचा भास पुस्तक वाचताना होतो..
त्या 70 दिवसात त्यांची सांघिक एकी ,क्षणातच येणारं भव्य संकट आणि त्या संकटात एकमेकांचा बनलेले आधार,एकमेकां बददल प्रेम, जिव्हाळ सहज लक्षात येतो..
                       प्रत्येक दिवसाची सकाळ, रात्रिची तूटपूंजी झोप तरीही प्रचंड उत्साहित असलेले चेहरे, एक वेगळाच आत्मविश्वास आणि देवावरील अखंड श्रद्धा त्यांच्या जगण्यातून लक्षात येते

            त्या बर्फाळी एंडीज पर्वतावरुन गाव शोधन्या साठी त्यानी केलेला प्रयत्न आणि रोजच त्या प्रयत्नात येणारी नवी निराशा, एक चॉकलेट आणि दारुचा एक घोट फक्त एवढाच आहार घेऊन सुरूवातीचे काढलेले आठ दिवस आणि त्यात त्यांची झालेली दैनीय अवस्था मनाला हलवून टाकते..
शेवटी पोटाची आग आपल्या पैकीच फेयर चाईल्ड वर मेलेल्या आपल्याच मित्राचं प्रेत खायला भाग पाड़ते..
शेवटी त्या उतारू पैकी लेनेसा आणि प्यारेडो या दोघाना गाव शोधन्यात यश  मिळतं.

फेयर चाईल्ड मधील मेलेल्या लोकांना जी बर्फामुळे जशीच्या तशीच राहिली होती त्यांना पुरन्यात येतं व वाचलेल्या 14 उतारूना हेलीकॉप्टर च्या मदतीने सुरक्षित पोहचन्यात येतं.

      अश्या या दुर्दैवी अपघाता मधून 45 पैकी वाचलेल्या 16 जनाची थरारक अशी सत्यकथा रविंद्र गुर्जर यानी ज्वलंत स्वरुपात मांडली आहे..

पुस्तक अनुभव साभार:सहवास पुस्तकाचा...✍️फेसबुक वाल

9421605019 

वरील व्हॉटसअप करून कळवावे.
पुस्तक घरपोच मिळेल.

UPI गूगल पे,फोन पे,Bhim अॅप व चेक ने ही रक्कम स्वीकारली जाईल.

पुस्तक परिचय फेसबुक आणि व्हॉटसअप वर मिळतील

9421605019 वर व्हॉटसअप करून पुस्तक परिचय असे लिहावे.

फेसबुकवर या लिंकवर जाऊन ग्रुप मध्ये सहभागी व्हावे

https://www.facebook.com/groups/786455098227669/

ज्ञानसाधना पुस्तक परिचय व विक्री परभणी .रावजी लुटे

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know