WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Monday, October 11, 2021

पुस्तकाचे नाव : वपुर्झा

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य  

पुस्तकाचे नाव : वपुर्झा .

पुस्तक क्रमांक : 27.

पुस्तक परिचयकर्ता  : 

श्री . मनोज अग्रवाल .

प्रकाशन संस्था  : मेहता    पब्लिकेशन .

पृष्ठसंख्या  : 258.

पुस्तकाची किंमत : 200 रुपये .

             प्रसिध्द महान लेखक ,साहित्यिक, कथाकथनकार ,उत्तम फोटोग्राफर  वसंत पुरुषोत्तम  काळे यांचे वपुर्झा हे अतिशय प्रसिध्द, रसिकांच्या आवडीची असलेले पुस्तक वाचनसमृद्धी स्पर्धेमध्ये  मला बक्षीस म्हणून   प्राप्त झाले  त्यामुळे वाचन साखळी समूहाच्या आदरणीय संयोजिका व बक्षीस प्रायोजक श्रीमती प्रतिभा लोखंडे मॅडम   यांचे मनःपूर्वक आभार ! तसेच वाचन साखळी समूहाच्या सहसंयोजिका  श्रीमती प्रतिभा टेमकर यांचेही धन्यवाद!  व पु काळे यांचे हे  पुस्तक वाचकाला वाचनाचा लळा लावल्याशिवाय राहत नाही आणि लेखकाची   आणखी अधिक पुस्तके वाचावीत अशी मनात  लालसा निर्माण होते . हे पुस्तक वाचताना आपल्याविषयीच पुस्तक लिहिलं आहे अशी आपल्याला खात्री वाटत जाते . वपुंचे सामाजिक भान आजही किती कालातीत आहे हे आपल्याला या लेखनातून समजून येते. तसेच लेखक  एक बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते हे त्यांच्या लेखनातून उद्धृत   झाल्याशिवाय राहत नाही . तीन लाखांपेक्षा अधिक मनामध्ये घर करणारे व अतिशय उत्तम ,मराठी साहित्यातील एक आगळीवेगळी कलाकृती आहे. 
    लेखक   सुरुवातीलाच म्हणतात  ,

     शांतचित्त ज्ञाना रोखठोक तुका यांचा अपूर्व संगम म्हणजे दुर्गाबाई भागवत  यांना समर्पित  !

    पुस्तकाची सुरुवात अतिशय लक्षवेधकपणे  केलेली आहे. ते म्हणतात मुखपृष्ठावर चहाचा पेला   रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी ,मनातले साठलेले जळमटं ,जळजळ स्वत: बाबत  असलेल्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला   नव्या विचारांसाठी रिकामा राहतो .
     नवे विचार वाचकांना देण्यासाठी व पुन्हा सुचलेली ही सर्जनशीलता वपुंची सर्जनात्मकता किती सुंदर आहे हे आपल्याला यावरून दिसून येते .
   हे पुस्तक वाचताना मला आणखी एक जाणवलं की साहित्य क्षेत्रातील प्रकांड पंडित व्यक्तिमत्त्व आपल्या पाठीवर हात ठेवून काहीतरी समजावून सांगत आहे याचा भास झाल्याशिवाय राहत नाही .  

        लेखक  म्हणतात स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कुणी सांगितलं अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो .  
      क्षमाभाव ,वात्सल्य हे गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही पुरूषांमध्येही ते असतात .
      एक मनुष्यजन्म तोही म्हणे चौऱ्याऐंशी लक्ष्य फेऱ्यानंतर अर्थात मला त्याच्याशी कर्तव्य नाही मला दिसतो तो समोरचा जीता जागता माणूस म्हणजेच वस्तुस्थिती जे आहे समोरच्या व्यक्तीला  आहे त्याप्रमाणे स्वीकारणं ही खूप मोठी बाब आहे असे येथे लेखकास म्हणावयाचे आहे .
     आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी विचार म्हणजे आपलं कोणीही   अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय . 

    आता या सगळ्यांच्या जगात व म्हणतात की दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो कारण तो   समाजात दुबळा म्हणून मानला जातो.   

     आजच्या पांढरपेशा संस्कृतीविषयी लेखक   म्हणतात माणूस जितक्या मोठय़ा पदावर, स्थानावर तितका तो स्वार्थी, मतलबी,  सत्ता आणि पैसा या दोन गोष्टी मिळवण्यासाठी तो राक्षस होतो .छोट्या छोट्या माणसांचे तो लीलया बळी घेतो बळी घ्यायचा म्हणजे प्रत्येक वेळी जीव घ्यावा लागतो असं नाही .
       संसाराबद्दल अतिशय सुंदर रीतीने त्यांचे मत व्यक्त करतात.   संसार या शब्दांबरोबर संघर्षालाच संघर्ष नेहमी दुसर्या माणसाबरोबर असतो असं नाही .  नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वत :वरच आली की स्वत :शीच संघर्ष सुरू होतो पुरुषांचं लग्न झाल म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते  ही वस्तुस्थिती अतिशय सुंदर रीतीने लेखकाने   वर्णन  केलेली  आहे .
वार  बद्दल म्हणतात सगळे वार परतवता येतात अहंकारावर झालेला वार वर्तवता येत नाही आणि पचवता येत नाही .  

    दैनंदिन जीवनामध्ये खर्च किती होतोय याचा जास्त मेळ   लागत नाही त्यामुळेच माणूस दुखावतो खर्च झाल्याच त्याला दु: ख नसतं . 

    व पु अतिशय प्रामाणिकपणे व्यक्त करतात तुम्ही नुसते गुणी   असून चालत नाही ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्याभोवती असणं याला महत्त्व आहे  गुन्हे माणसाचं वाजण्यास कठीण होऊन बसले आहे.
     नियतीच  माणसाला काही सुखांना पारख  करते तेव्हा तिथं इलाजच नसतो .पण त्याहीपेक्षा माणूस जेव्हा दुसर्या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त  असतं .
     यावरून नियतीबद्दल लेखकास   जाणीव होती त्या जाणिवेची आपणास माहिती होते.  
      आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो ,त्याने एकदा स्वत: ची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
     माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो त्याला म्हणूनच हवे असते एकसोबत जिला   मनातली सगळी स्पंदन समजतील ,आकांत कळेल, आक्रोश उमगेल ,महत्त्वाकांक्षा पेलेल अशी अशी साथ हवी असते.यावरून व पुन्हा माणसाचा सामाजिकीकरण होणं हे किती महत्त्वाचा वाटत होतं हे आपणास समजते .
        श्रेष्ठत्वला  पोहोचलेले व्यक्तीबद्दल व म्हणतात कोणत्याही श्रेष्ठ पदाला   पोहोचलेल्या  व्यक्तीला समर्थनाशिवाय स्वतःचा श्रेष्ठत्व टिकवता आला पाहिजे  .
    समस्येबद्दल बोलताना व खूप सुंदर मत व्यक्त करतात .एका माणसाच्या समस्येवर दुसर्या माणसाजवळ उत्तरच नसतं कारण सल्ला देणाऱ्या त्या समस्या पर्यंत पोहोचू शकत नाही. तो स्वतःच्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे  त्या समस्येकडे पाहतो  .
  आकाशाने   मृगनक्षत्र लागल्यावर सरींचा अभिषेक करण्यासाठी कमळाचे द्रोण वापरले की जमीनही कवचकुंडल काढून देते .
    श्रोत्यांच्या महत्वाबद्दल   व पु मत मांडतात प्रतिसाद देणार्या व्यक्तीलाच   अस्तित्व असतं .
    कलेचा विकास व्हावा हा निखळ हेतू मनात असला की कोणत्याही व्यक्तीच्या विरूध्द दावा असूच शकत नाही .या वाक्यावरून समजते की व पु काळे हे किती कलासक्त आणि कलाप्रेमी हाेते .
    सातजन्मी हाच पती मिळावा याबद्दल लेखक   म्हणतात .बायका सातजन्मी तोच नवरा मागतात याचं कारण माझ्या दृष्टीने फार वेगळं आहे .पहिल्या जन्मी नवऱ्याचे वीक पॉईंट्स समजलेले असतात .कुठे बोट ठेवलं की तो गप्प बसतो याच अचूक ज्ञान झालेलं असतं.  तेव्हा साहजिकच सात जन्मापर्यंत  निरनिराळ्या ट्रायल्स तरी नकोत घ्यायला .
    वाचनाबद्दल व पु अतिशय सुंदर रीतीने  त्यांचे स्पष्ट मत   व्यक्त करतात ,त्यांचे विचार मांडतात ,नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही .वाचलेल्या विचारांना स्वत: चे   अनुभव जोडायचे असतात .म्हणजे  तेथे साहित्य स्वत :पुरतं चिरंजीव होत.
करमणूक करून घेतानाही स्वत: ला खर्ची घातल्याशिवाय  करमणूक होत   नाही .साहित्यात   आपल्या विचारांची   कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही .
लेखक हा संवादाचा भुकेलेला असतो ,त्याला संवाद हवा असतो असे  मत  या ठिकाणी लेखक   प्रकर्षाने मांडतात .
    आपल्या संग्रही  असावे  असे  एक अतिशय सुंदर पुस्तक म्हणजेच  वपुर्झा !

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know