WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Wednesday, October 6, 2021

पुस्तकाचे नाव – गांधार

परिचय कर्ता– प्रा.सौ.सुरभी विवेक धोंगडी, नागपूर 
पुस्तकाचे नाव – गांधार 
लेखक – प्रसाद बरवे 
प्रकाशक व मुद्रक – नचिकेत प्रकाशन– श्री.श्रीनिकेत अनिल सांबरे , नागपूर 
मूल्य रु – २००/- 
वाङ्ममय प्रकार- ऐतिहासिक कादंबरी
-------------------------------------------------
गांधार - गौरवशाली इतिहासाचे सिंहावलोकन
(पुस्तक परिचय) 

गांधार,भारतवर्षाचा सुवर्ण इतिहास आणि इतिहासास सुवर्णमयी करणाऱ्या महापराक्रमी राष्ट्रभक्त योद्धांची प्रेरक संघर्षमयी यशोगाथा आहे.हा इतिहास आहे त्या तेजोमय भारतीय हिंदू पौरुषत्वाचा ज्यात दोन हजार वर्षे अखंड अविरत भारतमातेच्या सरंक्षणार्थ परकीय आक्रमणांविरुद्ध लढलेल्या विरपुत्रांचा ! पण हा गौरवशाली इतिहास आजही अनभिज्ञ आहे . इतिहास आपल्याला वर्तमान आणि भविष्याची सुरक्षित वाट दाखवित असतो .आणि हीच  बाब प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न , या गांधार लघु कादंबरीच्या निम्मिताने लेखक प्रसाद बरवे यांनी केला आहे. प्रगल्भ वास्तव वैचारिक चिंतन, प्रभावी भाषा, बोधप्रद सूत्रमय कथा, आणि प्रवाही लेखन शैलीतून गांधार कथा आपल्या पुढे मांडली आहे. 

गांधार कादंबरी आपल्या डोळ्यासमोर इसवी सन पूर्व ते सन १०२६ पर्यंतचा विशाल इतिहासपट उभा करते. यासाठी काल्पनिक पात्र, तक्षशिला विश्वविद्यालयात ज्ञानार्जन करण्यासाठी पाच भागातून आलेल्या पाच शिष्य आणि त्यांचे मुख्य आचार्य यांचा संवादासोबत कालखंड  १०२५ ते १०२६ मधील सत्य पराक्रमी गाथांना एका दुव्यात गुंफत हे कथानक योजले आहे.

कथेची सुरवात होते ती सर्वंदृष्ट्या संपन्न, सुखसमृद्ध भारतवर्षातील भरतपुत्र तक्ष निर्मित तक्षशिलेच्या ओळखीने ! संस्कृतीक , नैसर्गीक, वैदिक, धामिर्क, वैचारिक सुखसमृध्दी ने नाहलेली ही देवभूमी. सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध असलेले विश्वप्रसिद्ध विश्वविद्यालय . ज्यात प्रचंड हस्तलिखित ग्रंथसंपदा आहे .  ज्ञानार्जनासाठी आलेल्या शिष्यांना परिपुर्ण, कर्त्यव्यदक्ष, आत्मनिर्भर, संवेदनशील आणि सक्षम बनविणारे महान आचार्य अश्वघोष, पाणिनी, आणि चाणक्यांचे हे विद्यागृह. जेथे समस्त विषय सर्वसमावेशक शिक्षणव्यवस्था व गुरुकुल होते. येथे बुद्धविचारांचा ही प्रभाव होता, हिंदुकुशात बुद्धांशी निगडित लेणी, शिल्प व गुहाचित्र, उत्तम शिल्पकला, चित्रकला आणि वास्तुकलेने निपूण असलेल्या भारताची साक्ष देतात.

पुढील कथा येते ती गुरू-शिष्य संवादात्मक स्वरूपात जो दीक्षांत समारंभ वसंत पंचमी या दिनी घडतो. पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन करतांना आचार्य इतिहास, नितीमत्ता, न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र , वैदिक संस्कृती त्याचे चार पुरुषार्थ व अवलंबनासाठी दिलेले चार आश्रम, वेदोपनिषिद आणि संहिता यांची आवश्यकता व त्यामागील तर्क सांगतात. बौद्धांच्या अहिंसा तत्वाच्या अतिरेकी अवलंबनामुळे झालेल्या  ह्रासाची पुनरावृत्ती टाळण्याचा  उपदेश देतात. संकटकाळी अहिंसेचे अवलंबन हा देखील गुन्हाच ! "उतिष्टत जाग्रत" हे ब्रीद मना मनात रुजवत आचार्य चाणाक्यांनी झाकाळलेले  हिंदू क्षात्रीय तेज जागृत केलं ! आर्यावर्ताच्या  संरक्षणासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचा संदर्भ देखील आचार्यांनी दिला आहे .
आयुष्यातील हिंदू सनातन संस्कृतीचे महत्व व अंतर्गत येणाऱ्या गोष्टींचा अर्थ उलगडतांना त्यात गाय, होम, यज्ञ, मंदिर, स्तवन-स्तोत्र, स्त्रीशिक्षण, पवित्र अग्निचे प्रतिक भगवा झेंडा यांचा उल्लेख आहे. अद्भुत शिल्पकला असलेली  चार मार्तंड मंदिरे, पंचधातून मढलेले विंष्णू मंदिर यांचा  संदर्भ  देखील गंधार या कथेत आपल्याला  आढळतो. अमूल्य वारसा जपण्यासाठी एकत्रिकरण , लोकजागर करणे गरजेच ! ह्यचा उगम स्रोत काय ? आपण कोण आहोत ?  याचे उत्तर आचार्यांनी दिले . सुरवात झाली ती महान स्वायंम्भूव मनूपासून , ऋषी आशिर्वादाने पुष्ट धर्मराष्ट्र, मानवराष्ट्राच्या आर्यवताच्या ओजस्वी उदयाने ! 

पुढील कथा आपल्याला भारतभूमीवर झालेल्या परकिय आक्रमणांचे आक्रांतचे विनाशी विकृत यवनांचे त्यांच्या उदयाचे, आणि भारतमातेच्या सुपुत्रांच्या सम्राटांच्या, शुरांच्या, विरांच्या हस्ते झालेल्या यवन अस्ताचे आणि पराक्रमी विजयाचे दर्शन घडवते ! परकीय आक्रमणे झालीत ती मुख्यतः वायव्येकडून आलेल्या  ग्रीक राजा  अलेक्झांडर, टोळ्या बनवून आलेल्या शकांचे , तिसरे  कुषाणांचे . जे येथेच वसले आणि पचवले गेले . पाचवे चीन, मंगोलियातून आलेल्या हूण राजा तोरणमल व मीहिरकुलाचे.  ही सर्व आक्रमणे फक्त धन संपत्ती लुटण्यापर्यंत मर्यादित होती . तिही येथील पराक्रमी  महान शासकांनी परतवली . यात प्रामुख्याने चंद्रगुप्त मौर्य, शकारी विक्रमादित्य, समुद्रगपुप्त, चंद्रगुप्त , नरेशगुप्त, नरसिंह गुप्त , सम्राट हर्षवर्धन होते. 

परंतु हिंदुवैभवला उतरती कळा लागली ती इस्लामिक आक्रमणानंतरच ! निरीश्वरवादी असणारे हे लोक , समुहाने एक प्रार्थना शिस्तीत करणारे , सुरवातीला शांतीप्रिय परंतु नंतर मुर्तीपुजाकांचे शिरकाण , त्यांचे विध्वंसक, विकृत, विनाशकारीवृत्तीने बरबटलेला घृणात्मक विचारांचे तांडव  . ज्यांना धन -धान्यासोबत स्त्रिया देखील उपभोगाच्या वस्तू  वाटत . नरसंहारात आनंद, मूर्तिपूजेला विरोध, मूर्तींचा विध्वंस  आणि मूर्तिपूजकांचा नरबळी, बंदी करून गुलामी, सैन्यभरती, स्त्रियांचा बाजार व जनानखान्यात वापर असा  हृदयद्रावक प्रकार !

यांची सुरवात झाली ती मोहम्मद बीन कासीमच्या सिंध आक्रमणाने जे सातत्याने तीन शतके सुरू होते ! ह्या आक्रमकांचा आर्यावर्ताने प्रतिकार केला . यात राजे रणबल पितापुत्र, चंद्रपीड व महान ललितादित्य , योद्धा जयपाल राजे, आनंदपाल त्रिलोचनपाल , त्याच बरोबर सुमेरचे वीर राजपूत अविरत प्राणपणाने लढले होते  जिंकले होते .
कथेमध्ये पुढे  आचार्य आपल्या शिष्यांना आर्यावर्त कसं होरपळलं  जातय आणि याविरुद्ध कार्य करणे हे देखील तुमचे कर्त्यव आहे असे उद्बोधन करतात व पाचही शिष्य कानात प्राण ओतून एक एक शब्द ऐकत शरिराच्या कणाकणात वीरश्रीस प्रवाहित करतात . यात एक नवीन माहिती त्यांना आचार्य देतात ती ऋषी देवल आणि भाष्यकार मेधातीथी यांच्या कार्याची.  बळजबरी धर्मांतरण झालेल्या लोकांना शुद्धीकरणाद्वारे हिंदुधर्मात परतीचा मार्ग मोकळा करण्याची . यासाठी देवलस्मृती संहिता आणि मेधातिथींच्या हिंदू धर्म जागरण प्रचार प्रसार कार्याचा उल्लेख आहे . 
दीक्षांत समारोहानंतर सगळे शिष्य आपापल्या स्वगृही मार्गक्रमण करतात . पण मार्गतच त्यांना गुजरातच्या सोरटी सोमनाथ मंदिर महमूद सेनेने लुटल्याची बातमी कानावर येते. पुढे हिंदुकुशातील करूणाभद्राचे बुद्ध विहार उध्वस्त केल्याची वार्ता ऐकून, आल्यापावली राष्ट्राप्रतीचा कर्तव्यास जाणून तक्षशिलेस परतात ज्यातील एक शिष्य भीम हा सोमनाथ लुटीच्या संघर्षात सर्वशक्तीनिशी विरोध करतो.  हे पाच शिष्य, तक्षशिलेचे इतर विद्यार्थी तसेच आणि रामसिंहाची सेना एकत्र येवून गझनीला परतणाऱ्या महमूद सेनेचा पाठलाग करतात . महमूद निसटतो पण मागे ठेवलेल्या सेनेचा फडशा हे विद्यार्थी करतात . महमुदाने बंदी केलेल्या रंगनाथपुरातील स्त्रियांना  सन्मानाने सोडवून स्वगृही सुरक्षितरित्या पोहचते करतात आणि सोमनाथाचा सुवर्ण ध्वज शिरी घेऊन येत विजयश्रीचा नवा अध्याय सुवर्णाक्षरात लिहितात .

भारत म्हणजे तेजात रममाण, प्रखर तेजस्वी असा आपला देश आहे! त्याचा विस्ताराची प्रचंडता पुढील श्लोकात विशद केली आहे,
       उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः || 

अर्थात समुद्राच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस जो देश आहे त्यास भारत म्हणतात तसेच त्याच्या संततीस (नागरिकांना) भारती संबोधतात. अशा विशालकाय पवित्र भारताची हिंदू सनातन संस्कृती आणि भगवा ध्वज हे त्याचे प्राण आहे जे जपण्यासाठी हजारो वर्षे  हजारो वीरांनी पराक्रमाची शर्थ केली. वायव्येकडील आपल्या या वीर पूर्वजांनी प्रचंड संघर्ष केला आहे. आपली भूमाता परकियांच्या आक्रमणांपासून सुरक्षित राहावी , आपली पूजनीय हिंदू संस्कृती, परंपरा अबाधित रहावी याकरिता सर्वार्थाने लढलेल्या  हिंदूच्या शौर्याचा  इतिहास वंदनिय सुद्धा तितकाच आहे याची जाणीव ही कादंबरी वाचताना प्रकर्षाने होते . त्या वीरांची ही संघर्ष गाथा , त्याचे मूल्य शब्दांत न मांडता येईल इतके भव्यदिव्य आहे याची प्रखर जाणीव कादंबरी वाचताना प्रत्येक शब्दगणिक होते. अशा या गौरवशाली इतिसाचे चित्तथरारक,प्रेरक सिंहावलोकन म्हणजे  "गांधार" !

         
                                            

-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know