परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-४७
पुस्तकाचे नांव--आनंदयोग
लेखकाचे नांव--श्रीकृष्ण व्यवहारे
प्रकाशक-घंटाळी मित्रसमूह ,ठाणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-२३२
वाङमय प्रकार -- ललित
मूल्य--६५₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
४७||पुस्तक परिचय
आनंदयोग
लेखक-श्रीकृष्ण व्यवहारे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
'योगश्चित्तवृत्तिनिरोध:'योग म्हणजे चित्तांच्या वृत्तींचा निरोध होतो.
मन, अहंकार व बुद्धी या तिन्हींचे मिळून चित्त बनले आहे.त्यांची स्थिर अवस्था म्हणजे योग आणि त्यासाठी ज्या मार्गाने जायचे तो मार्ग म्हणजे साध्य योग व योगसाधनही योगच आहे. मन मनगट आणि मेंदूचा विकास कसा साधावा याचीही माहिती विषद केली आहे.तनमनाचा व्यायाम करुन आनंदाची अनुभूती मिळविणे.समाधानी वृत्तीने जीवनात आनंद मिळविणे म्हणजे 'आनंदयोग'होय
''योग, उद्योग आणि सहयोग"या ब्रिदवाक्यातून प्रतीत होणारा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ठाणे येथील घंटाळी मित्रमंडळाने अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबविले.आणि ते यशस्वी केले.
त्यातील समाजमान्यता मिळालेला अनेकांनी गौरवलेला उपक्रम म्हणजे योग प्रसार करणे.त्याचेच अक्षरशिल्प 'आनंदयोग'नावाचे पुस्तक संस्थेचे संस्थापक योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारले आहे.या पुस्तकात योगाचे सामाजिक अध्याय मांडले आहेत.
त्यातील वैशिष्ट्यपूर्ण लेख म्हणजे कारागृहात कैद्यांचे योग शिबीर आयोजित केले होते.
आनंदयोग या पुस्तकात योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांचे गुरू सदाशिव निंबाळकर यांनी या पुस्तकाचे कौतुक केले आहे.शरीर आणि मनाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आपण व्यायाम करतो.काहीजण योग साधना करतात.त्यातील योगासने ,प्राणायाम,मुद्रा,बंध आणि यौगिक क्रिया यांची सचित्र माहिती देणारी,प्रात्यक्षिक कसे करावे याची तपशीलवार मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके आहेत.परंतू आनंदयोग या पुस्तकात याच विषयाची माहिती तपशीलवार आणि योग साधनेचा उपयोग कसा करुन घेता येतो.याची माहिती छोट्या छोट्या लेखात समाविष्ट केली आहे.
योग म्हणजे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. शरीर आणि मनाची मशागत कशी असावी याचे उत्तम विवेचन केले आहे.योगासन वर्गांचे विविध ठिकाणी आयोजन करून झालेल्या फलश्रुतीची माहिती लेखात दिली आहे.
आपणाला योगसाधना करताना योग्य मार्गदर्शकाची गरज भासते.
आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असतो.योगाच्या अष्टांगाची माहिती आवश्यकतेनुसार दिलेली आहे.आहार विहार आणि विश्रांती याची सांगड घालून योग कसा करावा हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.
या पुस्तकात आपणास योगसाधना फायदेशीर कशी ठरते यांचे विवेचन आशयनिष्ठीत शब्दात केले आहे.
लेख वाचताना संदर्भ, चित्रे,तक्ते, वर्गीकरणे, काव्यपंक्ती आणि अवतरणांचा समर्पक उपयोग केला आहे.लेखकांनी योगशिक्षणाचे प्रशिक्षण घेतले आहे.स्वत:योग अभ्यासक व उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत.त्यांनी जे पाहिले, वाचले, अभ्यासले,शिकविले,चर्चिले आणि उपयोजिले त्यासर्वांचा परिपाक म्हणजे 'आनंदयोग'होय.असे त्यांचे गुरू सदाशिव निंबाळकर प्रस्तुत करतात.योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा,
योगशिक्षकांनी योगदान कसे द्यावे.
योगातील कठीण व गूढ वाटणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून सुलभता करण्याचा प्रयत्न केला आहे.या पुस्तकात ५१लेखांमधून त्यांनी योगसाधनेचं वैशिष्ट्यपूर्ण रितीने विषय प्रतिपादन केले आहे.
'योग'शब्दाचा अर्थ ते अंतरंग, इतिहास,उद्दिष्टे,समज- गैरसमज, आहार ,स्वास्थ्य, तणावमुक्ती, उपचारपद्धती,व्यायाम, संस्कार साधन, शालेय योगाभ्यास आणि कारागृहातील आनंदयोग इत्यादी लेखातून आनंदयोगाची माहिती दिली आहे.हटयोग,राजयोग आणि ध्यानयोग यासारखा वेगळा प्रकार नसून,योगसाधना करताना त्याचा मनस्वी आनंद घेणे म्हणजे आनंदयोग होय.कोणतीही शरीर मनाच्या विकासाची क्रिया करताना समरस होऊन आनंद मिळविणे म्हणजे आनंदयोग
आसनामुळे शरीर हलके व रोगरहित होते.प्राणायामामुळे मन नियंत्रित व स्थिर होते.धारणा आणि ध्यायाने आंतरिक शांतता मिळते.योगसाधना आरामात आणि आनंदात, यथाशक्ती आणि विधिवत् करणे म्हणजे आनंदयोग. योगसाधना प्रिय साधकांना हे पुस्तक अनमोल मार्गदर्शन करणारे आहे.
परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know