परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-४६
पुस्तकाचे नांव--येरवडा विद्यापीठातील दिवस
लेखकाचे नांव--डॉक्टर कुमार सप्तर्षी
प्रकाशक-पद्मगंधा प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-४००
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--राजकीय आत्मकथा
मूल्य--२७५₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
४६||पुस्तक परिचय
येरवडा विद्यापीठातील दिवस
लेखक-डॉक्टर कुमार सप्तर्षी
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
जेष्ठ समाजवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी.त्यांनी अहिंसक सत्याग्रह करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी केलेला संघर्ष,
सत्याग्रह,मोर्चे, भाषणे आणि आंदोलने केली.आणि त्यावेळी त्यांना न्यायालयाच्या आदेशाने शिक्षा आणि शासनाच्या आदेशाने स्थानबद्धता झाली होती.सजा भोगण्यासाठी येरवडा कारागृहात त्यांची रवानगी झाली होती.ते 'मिसा कायद्यान्वये शिक्षा झालेले पहिले राजबंदीही होते.तसेच त्यांना स्थानबद्धता संचारबंदी ,जिल्हाबंदी आणि आंदोलनातील सभांमुळे कारागृहात ठेवण्यात आले.त्यापैकी येरवडा,उस्मानाबाद,नाशिक,ठाणे आदी कारागृहाची माहिती आपणाला हे पुस्तक वाचताना लक्षात येते.
त्या काळातील कारागृहातील वास्तव्याचे यथार्थ वर्णन सोप्या भाषेत निर्भिडपणे वास्तव लेखन 'येरवडा विद्यापीठातील दिवस' राजकीय आत्मकथन या ग्रंथात केले आहे.
महाराष्ट्राच्या एका महत्त्वाच्या कालखंडातील राजकीय व सामाजिक चळवळींचा इतिहास वेधक शैलीत मांडला आहे.हे पुस्तक वाचताना त्यांचे राजकीय आत्मकथनच वाटते. येरवडा कारागृहाला ते विद्यापीठ म्हणून संबोधतात.
तेथील दैनंदिन काळाचे वर्णन वाचताना प्रत्यक्ष कारागृहातील स्थळप्रसंग आपण अनुभवतो.केवळ सिनेमात पाहिलेलं तुरुंगातील प्रसंग आणि शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा तुरुंग एवढीच माहिती आपल्याला असते.पण या पुस्तकात इतकं सुक्ष्मपणे बारकाईने वास्तव स्थितीचे मर्मबेधक वर्णन केले आहे.तुरुंगाचे खरं विश्र्व यातून समजते.माहितीचा उलगडा होतो.कैद्यांचे प्रकार,
डेपुटी,हजामपट्टी,दैनंदिन जीवन, आहार,कुपन,कैदी,जन्मठेप,शिस्त,वाॅर्डर,यार्ड,बराकी,कॅन्टीन,यार्ड,राऊंड,बंदी,नंबरकरी,मोठा दरवाजा, शिपाई,अधिकारी,बडासाब, गणवेश, सक्तमजुरी,ट्रायल अंडर,आर्थिक गुन्हेगारी, तस्करी, भिशी,हंडी आणि कोरांटी इत्यादींची तुरुंगातील पारिभाषिक शब्दांची माहिती खुमासदार शैलीत लिहिली आहे.
तसेच एखाद्या कैद्याला सजा द्यायची झाल्यास 'गरम करणं' कसं असतं याचं वर्णन वाचताना नवनवीन माहिती मिळते.कारागृहाची भाषा आणि स्वतंत्र विश्र्वाची ओळख या आत्मकथेतून घडते.तेथील वास्तव स्थितीवर प्रकाश टाकला आहे.
आंदोलन,चळवळी आणि सत्याग्रह केल्यामुळे शासनाने समाजातून बहिष्कृत करुन कोठडीत कुलुपबंद केले.बाह्य जगाशी संबंध तोडला.'
अंतहीन बराकीतील भयाण एकांतवासात मन स्वत:शीच बोलतं राहतं.स्वत:ला चिंतनाच्या भट्टीत घालून सक्तीची आत्मनिष्ठा पाळावी लागते.झालेल्या कारावासाला ते नियतीने दिलेली सुवर्णसंधी समजून मी माझं जीवन बहुआयामी बनलं आहे.'हे ते मनोगतात व्यक्त करतात.'स्मृतीच्या आधारे केलेले लिखाण हे माझे चिंतनशील अनुभव आहेत.या हृदयीचे त्या हृदयी पोचविण्याचा हा नम्र प्रयत्न मी केलेला आहे.' या विद्यापीठाने त्यांचे जीवन घडविले,जीवनाचे दडलेले अर्थ उलगडून दाखवले.
आत्मपरीक्षण करायला लावले आहे.
कैद्यांच्या समवेत गप्पाष्टकांतून त्यांच्या व्यथा आणि पूर्व इतिहास समजला.आणिकारागृहातील पारिभाषिक आणि सांकेतिक भाषेचा उलगडा झाला.येरवड्याच्या ज्या 'बी' वार्डमध्ये ब्रिटीश जमान्यात 'सरदार वल्लभभाई पटेल' आणि 'महात्मा गांधींच' पहिल्या दोन बराकीत वास्तव्य होतं.ती बराक बघण्याची संधी त्यांना मिळाली.
डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना जिल्हाबंदी,मोर्चे,सत्याग्रह,घेराव घालणे, संचारबंदी इत्यादी आंदोलनांमुळे ३५ वेळा अटक झाली होती.पहिली अटक १९६८ साली केंद्रिय संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर रेल्वे अडवली होती तेव्हा झाली होती.राहुरी कृषी महाविद्यालयाच्या कॅपिटिशन फी आणि कुलगुरू हटाव मोहिम,सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश न देता कॅपिटेशन फी घेऊन प्रवेश देणेबद्दल,तसेच लातूर येथे अचानक घडलेली दंगल,आणि पोलिसांचा आंदोलकांवर लाठी हल्ला त्यामुळे संचारबंदी लागू असताना मूकमोर्चा काढून भाषणं केली म्हणून सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
१९६७ साली युवक क्रांती दलाची स्थापना झाली होती. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला.बाबा आमटेंच्या नेतृत्वाखाली सोमनाथ येथील जंगलात युवकांचे'श्रम संस्कार छावणी'संघटित केली होती.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली भारत यात्रेत सहभाग घेतला होता.१९७८ साली ते जनता पक्षाचे अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले होते.ते देशात झालेल्या आणीबाणीच्या काळात दीर्घकाळ कारावासात राजकीय बंदी होते.
त्यांनी येरवडा कारागृहात तालीमीची दुरुस्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने केली होती.कैदी मल्लांना कुस्तीचा सराव करुन बाहेर दंगलमध्ये कुस्त्या खेळायची संधी मिळाली होती.त्यांनी कोठडीमध्ये तत्कालीनकारणांमुळे दवाखानाही चालू केला होता.
अनेक कैदी व शिपाई तिथं औषध घ्यायला येत होते.वॉर्डर मोहन पहेलवानाची बंधूंच्या कर्तव्यपुर्तीची कहाणी चित्ताकर्षकपणे भावते.
तसेच या विद्यापीठात अधिकारी आणि शिपाई, कैदी आणि ब वर्गातील स्थानबद्ध बंदी आदी भेटलेल्या व्यक्तींचं चित्रण मार्मिकपणे आणि खुबीने लिहिली आहेत.
या विद्यापीठांत सत्याग्रहींना जन आंदोलनातील अनुभवविश्र्व सोबत घेऊनच प्रवेश मिळतो.एकेक कैदी म्हणजे समाजजीवनातील एक एक स्वतंत्र कहाणी.शेकडो संदर्भात जीवनाचे कसं रुप बदलतं, याचं जवळून दर्शन घडते.एक सामाजिक चळवळीत कार्यकर्ते आणि सत्याग्रही विचारधारेची माहिती समजते.
डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या सत्याग्रह,सभा आणि आंदोलनाचा आलेख, तसेच त्यातून झालेल्या बंदिवासाच्या सजा आणि कारागृहाने दिलेली आत्मनिष्ठा यांचे सविस्तरपणे घटना प्रसंगाची पोलिस आणि शासन संस्थेबरोबरची संघर्षमय जीवनपट स्वलेखणीने उलगडून दाखवलाआहे.
परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know