Friday, October 1, 2021

पुस्तकाचे नावः आय डेअर (चरित्र)

पुस्तकाचे नावः आय डेअर (चरित्र)
लेखक-परमेश डंगवाल
मराठी अनुवाद- आशा कर्दळे
प्रकाशन-  मेहता पब्लिशिंग पुणे
प्रथमावृत्ती-फेब्रुवारी1996
किंमत ः 200
परिचय क्रमांक ः 8
परिचयकर्ती ः सरोजिनी देवरे, मुंबई
__________________________________________

भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून किरण बेदी आपल्याला माहीत आहेतच. आय डेअर या पुस्तकात किरण बेदी यांचे नेतृत्वगुण आणि त्यांनी केलेले काम करताना आलेले अनुभव लेखिकेने प्रांजळपणे मांडले आहेत. हे पुस्तक संपूर्ण समाजाला, तरुण पिढीला आदर्शवत ठरणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची अोळख करून देणारे प्रेरणादायी हे पुस्तक आहे. 
'आय डेअर' हे आत्मचरित्रपर पुस्तक हिंदी भाषेत परमेश डंगवाल  यांनी लेखन केले असून या प्रेरणादायी चरित्राचे सुंदर रेखाटन केले आहे त्याचाच मराठी अनुवाद आशा कर्दळे  यांनी केला आहे. 
किरण बेदी यांच्यासारख्या तेजस्वी स्त्रीचे 'आय डेअर' हे चरित्र अनुवाद करताना लेखिकेपुढे फार मोठे आव्हान होते ते आव्हान स्वीकारताना गौरी जोग यांची त्यांना लेखनिक म्हणून मदत लाभली त्याचप्रमाणे श्री. अनिल किणीकर यांचे सहकार्य लाभले आहे. 
प्रवाह किती ही वेगवान आणि जोरदार असला तरी त्या प्रवाहाविरुद्ध पोहणाय्रा एका कर्तव्यशील स्त्रीची ही कहाणी रेखाटतांना लेखकाने लहानग्या किरणची जिद्द आणि चिकाटीचे दाखले  दिले आहेत. 
लेखकाने बेदी च्या लहानपणीच्या अवखळपणाच्या, धाडसाचे अनेक प्रसंग रेखाटले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. याप्रमाणे लहानग्या किरणचा शालेय प्रवास अतिशय सुंदर विषद केला आहे. 
लहानपणापासून खेळांची आवड असणारी किरण..त्यात मिळालेले प्रावीण्य. विशेष टेनिस बद्दलची आवड आणि या आवडीतून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी हे वर्णन रोमांचक आहे, काॅलेज जीवनातील प्रवास आणि एन. सी. सी ची आदर्श विद्यार्थ्यांनीचा मिळालेला किताब . हा किताबच यशस्वी जीवनात मार्गदर्शक ठरला हे लेखकांनी सचित्र दाखले देऊन स्पष्ट केला आहे. 
 पोलीस खात्यात जाणे एक मोठ दिव्य श्रीमती किरण बेदी यांनी अद्वितीय पोलीस अधिकारी अशी कीर्ती मिळवली. पदार्पणातच २६ जानेवारीला दिल्ली येथे पोलीस पथकाचे संचलनाचे नेतृत्व  करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार हे ऐकल्यावर स्फूर्तीने एक लढवय्या जिद्दीने . एका वजनदार तलवारीला हातात घेऊन सर्वात पुढे उभे राहून कौतुकास्पद कामगिरी बजावली. हा प्रसंग लेखकाने खूपच सुंदर शब्दांंत शब्दबद्ध केला आहे. 
भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांच्या कार्यनिष्ठेची आणि समर्पणाची तसेच माणसाच्या अवस्थेविषयी संवेदनशील असण्याचे परिणाम तेवीस वर्षाच्या नोकरीच्या काळात श्रीमती किरण बेदी यांनी अव्दितीय पोलीस अधिकारी अशी कीर्ती मिळवली..धाडसी नेतृत्व, करारीपणा, कडकशिस्त याचे अनेक प्रसंग लेखकाने आय डेअरमध्ये मांडले आहेत. त्यातील एक प्रसंग
शिस्त व कर्तव्ये यात समोर कोण आहे असा त्यांनी भेद केला नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीत कर्तव्यावर असताना तत्कालिन पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांच्या गाडीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केले असता गाडी अडवून कायदा सगळ्यांना सारखाच असतो हे दाखवून दिले पुस्तकात दिलेल्या कारकिर्दीतील अनेक छोट्या मोठ्या उदाहरणानांनी आपण प्रेरित होतो. 
त्यानंतर लेखकाने तिहार तुरुंग अधिकारी असताना किरण बेदी यांच्या कार्याचा तपशील रेखाटला आहे. खिसा कापणे, बलात्कार, खून, दहशतवादी कारवाया अशा निरनिराळ्या गुन्ह्यांखाली अटक झालेले अनेक गुन्हेगार, निकालाची वाट पहात वर्षानुवर्षे हे कैदी तुरुंगात जणू खितपत पडलेले असतात .त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर पडावे यासाठी किरण बेदी यांनी केलेल्या तिहार जेलचा व गुन्हेगारात  कायापालट कसा केला याचे वर्णन लेखकाने आय डेअर मध्ये मांडला आहे. या कारकिर्दीचा डंका जगभर कसा पसरला पुस्तकात दिले आहे.
किरण बेदी यांना १९९४ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार म्हणजे आशियाई देशातील जणू नोबेल पुरस्कारच मानला जातो
पोलीस आणि जनता यांच्यातले अविश्वासाचे संबंध बदलून कठोर शिक्षा करणाऱ्या हातांऐवजी पुनर्वसन करणारे हात ..अट्टल गुन्हेगारांना माणसात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. . आणि कायद्याच्या कचाट्यातून  पार करून १९९३मध्ये तिहार कारागृहात अभूतपूर्व बदल केला आणि  कैद्यांना त्रासदायक ठरणाय्रा परिस्थिती विरुद्ध च काम केले यामुळेच विविध मानसन्मानाने जगानेच त्यांना मानवंदना दिली अशा अनेक गोष्टी पुस्तकात वाचनीय आहे
अनेक उदाहरणांचे दाखले देवून लेखकांनी किरण बेदी यांच्या कर्तृत्वाचे दाखले या पुस्तकात दिले आहे पुस्तक अतिशय वाचनीय तर आहेच त्याहून प्रेरणादायी आहे.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know