लेखक - झिग झिगलर
अनुवाद - सायली गोडसे
प्रकाशक - मंजुल पब्लिशिंग
यशोशिखराकडे जाणारी शेवटची पायरी
#इच्छाशक्ती
इच्छाशक्ती हा एक असा घटक आहे ज्यामुळे माणूस सामान्यत्वाच्या बेड्या तोडून असामान्य बनतो.
ध्येयाने झपाटून जातो आणि यश मिळवण्यासाठी अग्रेसर बनतो.
स्वतःच्या कमतरतांमुळे ,अडथळयांमुळे खचून न जाता क्षमतांचा विचार करतो.
परिणामांची फिकीर न करता सारे काही पणाला लावून अंतकरणात दडलेली प्रचंड उर्जा उपयोगात आणली जाते. मनापासून प्रयत्न केले जातात ,स्वतः शी स्पर्धा केली जाते.
आपल्या सभोवताली नकारात्मक वातावरण असते त्यामुळे आपण जिंकू शकणारच नाही असे सतत आपल्याला जाणवू दिले जाते पण इच्छाशक्ती ही एकच गोष्ट आपल्यात बुद्धिमान अज्ञान तयार होते त्यामुळे आपण तर्कापेक्षाही प्रयत्नांना सर्जनशीलता आणि सकारात्मकतेला प्राधान्य देतो. आपल्यात वाईटातून चांगले घडवण्याची जिद्द निर्माण होते.
आपला भूतकाळ काय होता हयापेक्षा आपला भविष्यकाळ कसा असावा हयावर भर दिला जातो.
आपल्यावर फेकलेल्या लिंबाचा रस करून ते विकण्याची जिद्द माणसात येते.....अशी जिद्दीचे अनेक उदाहरणे देता येतील
एका हाताने अपंग माणसाने गाडीत सेल्फ स्टार्ट बटनाचा शोध लावला.
तुरूंगात असताना टिळकांनी गीतारहस्य लिहिले.
-40℃ तापमानात दाढी करण्यासाठी इलेक्ट्रिक रेझरचा शोध लागला.
हया सहाही पायर्या ओलांडल्या की संधीचे प्रवेशद्वार लागते त्या संधीचा फायदा घेण्यासाठी मानवता, समजूतदारपणा, आत्मविश्वास, सहनशीलता, हया सार्यांचा आपल्या शस्त्रागारात समावेश करा आणि यश मिळवण्यासाठी सज्ज व्हा.
समाप्त
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know