WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Tuesday, August 17, 2021

द मिरँकल माँर्निंग लेखमाला भाग 2

द मिरँकल माँर्निंग
 लेखक - हँल एलराँड
अनुवाद - कमलेश सोमण
प्रकाशन - गोयल प्रकाशन

लेखमाला - भाग दुसरा

#पहाटे_का_उठायचे
         या जगात मृत्यू हेच एक शाश्वत सत्य आहे  आणि तो कधीतरी आपल्याला गाठणारच आहे पण त्यापूर्वी किमान आपण स्वतःला शोधले पाहिजे, 
हा शोध न घेणं म्हणजे जीवनात आंतरिक असंतोष, असंतुलन यांना आमंत्रण देणं. अपेक्षाभंगाचे असमाधान दुख उरावर कवटाळणे
त्यासाठीच आपल्याला स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यावी लागेल, स्वतःच्या शोधासाठी पहाटेचे ध्यान करावे लागेल कारण पहाटेची नीरव शांतता माणसाची संवेदनशीलता वाढवते, तो जीवनाबद्दल प्रतिसादक्षम बनतो.
प्रेम,सद्भाव,सद्विवेक,सकारात्मकता, मानसिक कणखरता आणि शांततेसह उत्साह, सृजनशीलता वाढते.नैराश्यावर मात करता येते. माणसाचा सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे प्रवास सुरू होतो कारण तो वास्तविकता स्वीकारतो. वर्तमानात जगायला लागतो आणि स्वतःची जबाबदारी घेतो.

#पहाटे_लवकर_कसे_उठायचे
          पहाटे लवकर उठण्याचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर लवकर जाग येण्यासाठी रोज किमान साडेआठ तास झोप पहाटेपूर्वी पूर्ण करावी लागेल (वयोमान, अनुवांशिकतेनुसार झोपेचे तास कमीजास्त होऊ शकतात )
झोप किती तासाची झाली हयापेक्षा ती किती शांत झोप होती हे महत्त्वाचे आहे.
झोपेतून उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतयं का हे महत्त्वाचे आहे.
कारण कितीतरी मनोकायिक आजारांच्या मागे झोपेची खराब क्वालिटी हेच कारण असते.
  झोप व्यवस्थित पूर्ण करत पहाटे उठण्यासाठी स्वतःची प्रेरणा उंचावा. अलार्म लावा. अलार्म बंद करण्यासाठी उठावेच लागेल इतके ते दूर असावे
उठल्यानंतर पहिले चेहऱ्यावर पाणी मारा
दात स्वच्छ घासा आणि ग्लासभर गरम पाणी प्या. पहाटेची शांतता अनुभवायला सुसज्ज व्हा.

#पहाटे_उठून_काय_करायचे
          देव आणि दानव हयांचे एकत्रित रूप म्हणजेच मानव....
आपल्यातील सकारात्मकता, आशावादी पणा ,उत्साह, चैतन्य, प्रेम वाढवून देवत्व वाढवायचे की
आपल्यातील नकारात्मकता, निराशावादी पणा ,निरूत्साह, वाईट विचार, भीती वाढवून दानवत्व वाढवायचे 
हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो
माणसाला सन्मार्गावर नेण्यासाठीच्या सहा गोष्टी म्हणजेच SAVERS असतात
S- Silence ( शांतता)
A - Affirmation (सकारात्मकता)
V- Visualisation (दृष्यमानता)
E- Exercise (शारिरीकक्षमता)
R- Reading (वाचनीयता)
S-Scribbing (अभिव्यक्तता)

हया सहाही गोष्टी रोज पहाटे उठून करायच्या असतात
सहा Savers बद्दल आधिक जाणून घेऊया उद्याच्या भागात

Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know