पुस्तकाचे नाव : आयुष्यरेखा
कवीचे नाव : श्री. सी.लक्ष्मण
पृष्ठसंख्या : 64
पुस्तकाची किंमत : 80 रुपये
पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल
आदरणीय कवी सी. लक्ष्मण हे वाचले की व्ही. व्ही. एस. लक्ष्मण(क्रिकेटपटू) ,आर. के. लक्ष्मण (व्यंगचित्रकार)या दिगगजांचे नाव आपसूक आठवते.या दिगगजांसारखी पराकोटीची उंची
साहित्य क्षेत्रात कवी लक्ष्मण यांना लाभो ही भगवंतांस प्रार्थना.
47 कवितांचा संग्रह असलेल्या या कवितासंग्रहात कवीने चतुरस्त्र पणा दर्शवून आयुष्यरेखा वाचकांसमोर रेखाटून आपल्या वेगळ्या काव्य लेखन शैलीचा परिचय करून दिला आहे.
प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या महान स्त्रियांचा
उल्लेख पहिल्या कवितेत कवीने करून स्त्री शक्तीच्या असीम सामर्थ्याची ओळख करून दिली आहे.
झाला नसता जन्म तुझा
तर आजची स्त्री अबला असती
या पंक्ती मनाचा ठाव घेतात.
वाटेकरी ही कविता स्वावलंबनाचा गुण अंगिकरण्याचा सल्ला देते.
माझ्या आकांक्षा, माझे स्वप्न
मलाच निभावणं आहे
कोणाचा भरवसा किती हे मला माहित नाही
माझे जीवनगाणे या कवितेत निरागस बालपणाचे
वर्णन कवी लिलया करतात.
कसे विसरू बालपणीचे ते चमचमते चांदणे
निखळ हसणे सरळ बोलणे
सप्तसुरांचा अर्थ न कळला कधी
तरी मानले जीवन आंनदगाणे
जीवनाविषयी असलेला आशावाद येथे प्रकटतो.
वास्तवता दर्शवणारी कविता म्हणजे
संदर्भ
सगळेच काही मनासारखे
घडत नाही कधी इथे
फुलण्याआधीच कळ्या
तोडल्या जातात इथे
काळ्या आईविषयी गौरवोद्गार काढताना कवी मांडतात
पांढरे ढग काळी आई
सारा डोलारा तिच्या ठायी
केव्हा या कवितेत कवीमन प्रश्न विचारते की
अरे उन्हा तू जाणार केव्हा
अरे पावसा तू येणार केव्हा
अरे कोरोना तू जाणार केव्हा
पुन्हा सुरळीत होणार केव्हा
नाती ही कविता वाचल्यावर डोळ्यांच्या कडा पाणावतात
असतात सर्वच नाती
असतात सर्वच सोबती
पण मनातलं सर्व काही व्यक्त व्हावं
असे असतात का कोणी
दोस्ती कवितेत कवीने कवितेचे रंजक सृजन करून वाचकाची रसिकता वाढवली आहे
ये दोस्ती हम नही तोडणगे ,असं म्हणायचो
तेव्हाही आमची दोस्ती होती अन आजही आहे
दोस्त दोस्त ना रहा ,प्यार प्यार नारहा
असं म्हणण्याची वेळ आता आली नाही पाहिजे
भारतीयांची स्वदेशप्रेमातील विसंगत मानसिकता
कवींनी स्वदेशप्रेम कवितेत व्यक्त केली आहे
माझी स्वदेशीची घोषणा फसवी का आहे
घरोघरी विदेश प्रेमाचं प्रदर्शन जे भरवलं आहे
या पुस्तकात माणुसकी, महान माझे राष्ट्र, नाळ, बाप, पेरा, धर्म चांगलाच असतो, मळा, प्रेम, रहस्य, उदास, आम्ही, निर्भया अशा अनेक कविता अप्रतिम आहेत.
आपल्या संग्रही असावे असा एक उत्तम कवितासंग्रह
म्हणजे आयुष्यरेखा!
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know