(#No_Excuse ! The Power of Self Disipline )
लेखक - ब्रायन ट्रेसी
. अनुवाद - शोभन शिकणीस
प्रकाशक - मंजुळ पब्लिकेशन
लेखमाला - भाग पहिला
लेखकाविषयी
1944 साली कँनडा येथील प्रतिष्ठित पण गरीब कुटुंबात ब्रायन यांचा जन्म झाला.
लहानपणीच शाळेला रामराम केला होता त्यामुळे कन्स्ट्रक्शन साइटवर फँक्टरीत साधारण कामगार म्हणून काही वर्षे अंगमेहनतीचे काम केले.
कामावर जायचे.पंचिग करायचे , टंगळमंगळ करत काम करून संध्याकाळी घरी परतायचे.
आपल्या संकुचित विचारसरणीमुळे ,स्वतः चे जीवन स्वत: च्या नियंत्रणाबाहेरचे आणि बाह्य परिस्थितीचा परिणाम आहे असेच त्यांना वाटायचे.
पण एका दिवशी साक्षात्कार झाला
आपल्या स्वत: च्या जीवनासाठी आपण स्वतःच जबाबदार आहे .
आपण साधे शालेय शिक्षण ग्रँज्युएशन पण पूर्ण केले नाही
त्यामुळे आपल्याला असे जीवन वाटयाला आलयं.
त्याचवेळी त्यांनी ठरवलं जे काही आजवर झाले त्या परिस्थितीला दोष देण्याच्या सबबी सांगण्यापेक्षा आपण हे कसे बदलू शकतो हयाची सक्रियपणे उत्तरे शोधूयात.
त्या दुपारी लंचब्रेक मध्ये त्यांनी दुकानातून पुस्तके खरेदी केली.
आपल्या आयुष्याचा पूर्ण ताबा घेतला त्यानंतर त्यांनी स्वतःचे यशस्वी करिअर घडवले,एक यशस्वी विक्रेता ते मल्टीमिलेनियर कंपनीचे CEO , Motivational Speaker असा त्यांचा आजवर प्रवास राहिला आहे.
गेली तीस वर्षाहून आधिक काळ त्यांनी त्यांच्या अनुभव व ज्ञानाच्या जोरावर अशा फूलप्रूफ टेक्निक्सचा संच बनवला की ज्या वापरून माणूस यशाचे टोक गाठू शकतो.
त्यातून एका आश्चर्यकारक पुस्तकाचा जन्म झाला ज्याने हजारो लोकांच्या आयुष्यात क्रांती घडवली. त्याचे पुस्तकाचे नाव आहे
'No Excuse'
पुस्तकाविषयी:
प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते जास्त पैसा कमावयचा असतो ,एक सुखी आनंदी निरोगी वैभवशाली आयुष्य जगायचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण लोक हया स्वप्नासाठी जगतच नाही
दरवेळी सबबी सांगत आयुष्य आहे तसेच कंठत राहतात...अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत !!!
हयाचे मुख्य कारण लेखक स्वयंशिस्तीचा अभाव असल्याचे लेखक सांगतात.
तर जाणून घेऊया स्वयंशिस्तीच्या शक्तीने यशस्वी व्हायचे 21 फाँर्म्युले हयापुढील काही भागात......
संदर्भ निलेश शिंदे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know