WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Sunday, May 23, 2021

लेखमाला भाग 4

#द_मँजिक_आँफ_थिंकीग_बिग
लेखक - डॉ. डेव्हिड जोसेफ श्‍वार्त्झ
अनुवाद - प्रशांत तळणीकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस

लेखमाला -भाग चौथा

आधीच्या भागात आपण भव्य विचार कसा करायचा ते बोलत होतो हया भागात त्या विषयालाच पुढे नेऊयात

भव्य विचार कसा करायचा

#नेतृत्व
आपल्याला इतर लोकांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळवायचा असेल तर त्यासाठी नेतृत्वगुण आपल्या अंगी असावा लागतो

नेतृत्वाबाबत चार नियम आहेत
1️⃣ ज्या लोकांवर प्रभाव पाडायचाय #त्यांच्यासारखा_विचार_करा.
 मित्र ,सहकारी, कर्मचारी यांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे अशी अपेक्षा असेल तर
➖सर्वप्रथम त्यांना समजून घ्या
➖त्यांच्या नजरेतून परिस्थितीला पाहा
➖त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा
➖त्यांना समजेल अशा भाषेत कामे समजावून सांगा
➖बोलताना आपला आवाज कर्णमधुर, श्रवणीय असू द्या
➖एखाद्याला भेटवस्तू देताना त्याला काय आवडेल याचा विचार करा
➖ज्यांच्यासाठी पार्टी अरेंज करत असाल त्यांना आवडेल असे खाद्य आणि संगीत असावे 
➖ भाषण करताना श्रोत्यांची पार्श्वभूमी व आवडनिवड जाणून घ्या
➖पोशाख घालताना आपण चांगले दिसतो का हयावर सिनियर्सची प्रतिक्रिया काय असेल विचार करा

2️⃣ #मानवतावादी_दृष्टिकोन
आपल्यासाठी काम करणारा पण माणूस आहे आणि त्यालाही जीव आहे
त्यामुळे त्याला यंत्रासारखे वागवू नये,
➖माणसाने माणसाशी माणसासम वागणे
➖हुकूमशाहाप्रमाणे न वागता सर्वांशी विचारविनिमय करून त्यांची मते जाणून घ्यावी
➖आपल्या कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात जपणे, त्यांची जबाबदारी घेणं
त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांचे सेलिब्रेशन करणे
➖चुका खाजगीत आणि कौतुक चारचौघात करणं
➖चांगल्या कामाची तोंडभरून स्तुती
जमलेच तर बक्षीस देऊन सन्मान

3️⃣ #प्रगतीचा_विचार
नेतृत्वाने नेहमी प्रगतीचाच विचार करा, प्रगतीवर श्रद्धा ठेवावी आणि प्रगतीचाच आग्रह धरावा
➖जैसे थे मानसिकता सोडा
➖कुठल्या गोष्टीत सुधारणा शक्य आहे त्या सर्व करून आपला ,कामाचा, उत्पादनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न
➖आपले काम आपल्या कनिष्ठांसाठी आणि आपण आपल्या मुलांसाठी 
आदर्श असे करण्याचा प्रयत्न
➖आपल्या कुटुंबाचे राहणीमान आणि आनंद उंचावण्याचा प्रयत्न
➖कुटुंबीयांना घराबाहेर पडून समाजोपयोगी प्रेरणादायी काम करण्यासाठी प्रोत्साहन
➖आपल्या मंडळ,सोसायटीच्या सुधारणांसाठी नवे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार
➖स्वतः ला अद्ययावत ठेवण्यासाठी सुनियोजित स्वयंशिक्षणाचा कार्यक्रम 
➖सुनिश्चित ध्येय आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यक्रम

4️⃣ #स्वतशी_विचारविनिमय
आपले मन कुलूपबंद आणि विचार उथळ होऊ नये यासाठी आपले स्व-संवाद आणि आत्मचिंतन खूप गरजेचं आहे.
➖रोज काही वेळ एकांतात घालवावा
(शक्यतो भल्या पहाटे )
➖आपल्या चांगल्या आणि कमकुवत बाजू जाणून घ्याव्यात ,स्वतः ची जाणीव वाढवा
➖एकांतात स्वतः शी विचारविनिमय करून समस्या सोडवण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी, भविष्याच्या योजना बनवण्याचा प्रयत्न
➖स्वतः चे मुक्त परीक्षण करून अधिक चांगले काम कसे करता येईल हयावर मनाचे मार्गदर्शन घ्या

सारांश
1. खुज्या विचारांच्या लोकांशी संघर्ष टाळा
2.आपल्यावर छुपे हल्ले, आपल्याविरुद्ध कटकारस्थाने होत असतील आपणं मोठे होतोय असे समजा आणि  असे छुपे प्रकार करणारया लोकांना मानसिक विकलांग समजा
3.स्वतः बद्दल नेहमी चांगला विचार करा, चांगले दिसा,असा आणि रहा
तुमच्या चांगल्या गुणांची जाहिरात करा
4.पीछेहाटीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी अपयशाला धडा म्हणून स्वीकारा आणि आलेल्या अनुभवाला चिकाटीची जोड देऊन पुन्हा नव्याने सुरुवात करा
कारण पराभव ही तात्पुरती अवस्था आहे
कायमस्वरूपी नाही.
5.सगळयांसाठी विशेष असे काही करण्याचा प्रयत्न करत राहा पण त्यांच्याकडूनही तसेच होईल याची मात्र अपेक्षा ठेवू नका
6.कुठलीही गोष्ट आणखी सुधारता येते
त्यामुळे सुधारणेला वाव देऊन आधिक चांगली सेवा द्या
7.आपल्या मनाचे स्वतः मालक बना

सरतेशेवटी कुठेही वाटले की आपल्या प्रगतीचा वेग मंदावतोय तर लगेचच भव्य विचार करायला सुरुवात करा

समाप्त.

Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know