WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Sunday, May 23, 2021

लेखमाला भाग 3

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड
(अंतर्मनाची शक्ती)
                                लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                                प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग तिसरा

#मानसोपचार_तंत्र

1️⃣ प्रार्थनातंत्र
आपल्याला जे काही हवयं ,ज्या आपल्या तीव्र इच्छा आहेत ,कामना आहेत त्या सुस्पष्ट कल्पनांची मानसप्रतिमा(image) किंवा मानस चलचित्र (video) बनवून रोज झोपण्यापूर्वी ते आठवून प्रार्थनेद्वारे ते ठाम विश्वासाने ते अंतर्मनापर्यंत पोहचवायचे.
अंतर्मनात त्याचे ठसे उमटू द्यायचे आणि मग अंतर्मन आपल्या आत्मशक्तीने ते वास्तवात आणते पण तोपर्यंत ते आपल्याला मिळालेच आहे असे समजायचे.

मानसप्रतिमा
योग्य कल्पनेचे किंवा हव्या असलेल्या गोष्टीची योग्य चित्र (image) डोळयासमोर आणायची त्याचबरोबर वर्तमानात शांती ,सुसंवाद, सुख अशा सद्गूणांचे चिंतन केले की मग अंतर्मन ती मानसप्रतिमा बाहयमनाकडून स्वीकारते.
पण मानसप्रतिमेमागची कल्पना सुस्पष्ट असावी आणि तुमची तिच्यावर निष्ठा आणि ठाम विश्वास असायला हवा.

 मानसिक चलचित्र (Video)  
हेही मानसप्रतिमेसारखेच असते पण त्यात आपण आपल्या कल्पनेचे नाटकीय रूपांतर करून त्याचे सिनेमासारखे चलचित्र बनवून बाहयमनातून आपण ते अंतर्मनाकडे पाठवू शकतो. रोज झोपण्यापूर्वी तो डोळयासमोर आणत कल्पनेत स्वप्न वास्तवात आल्यावरचा आनंद उपभोगायचा आणि विश्वासपूर्वक निष्ठेने जोपर्यंत स्वप्न सत्यात उतरत नाही तोवर देवाचे आभार मानत झोपी जायचे.

2️⃣ बाँडोइन तंत्र
रशियन मानसोपचार तज्ञ चार्ल्स बाँडोइन यांनी विकसित केलेल्या या तंत्रात आपण आपल्या कल्पनांना संक्षिप्त रूपात इतक्या सारांशरुपात आणायचे की ते स्मृतीत चटकन कोरले जाईल
एखाद्या अंगाईगीताप्रमाणे....
रात्री झोपण्यापूर्वी शरीर शांत रिलॅक्स करून अर्धजागृत अवस्थेत तो सारांश म्हणायचे आणि शेवटी "हे दैवी आदेशाने पूर्ण झालय "असे ठामपणे म्हणायचे 
आणि शेवटी अपार शांती अनुभवत गाढ झोपी जायचे .अंतर्मनात तो संदेश पोहचल्यावर पुढील कार्यवाही होते आणि त्या कल्पना वास्तवात उतरतात.

3️⃣ आभार तंत्र
हया तंत्रामध्ये आपली मागणी मनोमन  ईश्वराची अनुभूती घेत त्याच्यापुढे मांडायची 
आणि आपली मागणी मान्य व्हायच्या कृतज्ञतेने आभार मानायचे (Thanks in advane).
कृतज्ञ ह्रदय नेहमी ईश्वराच्या जवळ जाते त्यामुळे आपल्यावर ईश्वरी कृपेचा ओघ वाहू लागतो आणि आपली मागणी पूर्ण होते.
आपली प्रार्थना ईश्वर जरूर ऐकतो पण त्यासाठी आपले विचार मात्र सकारात्मक असावेत.

4️⃣वादविवाद पद्धत
Dr.Quimby हे मानसोपचारतज्ज्ञ आणि आध्यात्मिक उपचारांचे प्रणेते त्यांच्या हया पद्धतीत ते मानतात की रुग्णाच्या मनातल्या चुकीच्या धारणा विश्वासच आजाराच्या रुपाने आपल्याला दिसतात. त्यामुळे हे विचार बदलले की रोगी बरा होतो त्यासाठी ते रोग्याचे विचार जाणून घेतात आणि तर्काद्वारे त्याच्या मनातले नकारात्मक विचार काढून त्याला सकारात्मक आणि चांगला माणूस बनवतात.

5️⃣परमविधी
हया उपचारपद्धतीत डॉक्टर अथवा चर्च मधील फादर रूग्णाचा उल्लेख करून ईश्वराचे गुणगान करतो,दैवी विचारात गढून जातो. एका आध्यात्मिक पातळीवर पोहचला की त्याला जाणवते की रूग्णामधील विसंगत गोष्टी ईश्वराच्या प्रेमसागरात विलीन होतात. प्रार्थनेच्या बळामुळे ईश्वर रूग्णाला बरे करतो.

6️⃣आदेशविधी
हयात एखाद्या गोष्टीचा आदेश देऊन ती गोष्ट घडवली जाते.
आपल्या शब्दांना भावना व आस्था यांची शक्ती येते आणि विश्वात्मक शक्ती आपल्यासाठी कार्य करते
हयातही मन स्थिर करून शरीर रिलॅक्स करून आदेश दिला जातो की मी...ईश्वरासाठी मुक्त करत आहे.
मी आता आदेश देतो की 
"माझे शब्द असिमित मनात जावे आणि त्याने ते खरे करावेत"

Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know