WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Wednesday, November 10, 2021

गोष्टी मनाच्या

गोष्टी मनाच्या
लेखक : डॉ.विजया फडणीस
प्रकाशन : रोहन प्रकाशन

#संवाद_विसंवाद

आजकाल संवाद साधण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत (Call, Book, Tv, Radio, Social Network, visit) पण तरीही संवाद मात्र हरवत चाललाय.

#संवादाचे_फायदे
▪️संवाद मनस्वास्थ टिकवून ठेवणे 
▪️संवाद भावनांचा निचरा करते ,मनातील किल्मिष दूर करते. 
▪️संवाद माणसाच्या जगण्याला बळ देतो
▪️संवादच माहिती,भावनांची,विचारांची, देवाणघेवाण करतो.
▪️संवाद माणसाची मानसिकता घडवतो.
,▪️संवाद दृष्टिकोन तयार करतो
▪️संवादच माणसाची वैचारीक, शैक्षणिक पातळी दर्शवते.
▪️संवाद साधण्यात हावभाव, देहबोली यांचाही हातभार असतो
▪️संवाद व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लावतो 
▪️ संवाद सर्वच आर्थिक, सामाजिक, राजकीय, जागतिक व्यवहार तसेच सर्व आस्थापने,कुटुंब, संघटना यांना
सुरळीत ठेवतो.
▪️जिथे मनमोकळा संवाद असतो तिथे निर्भयता,जिव्हाळा, आपुलकीने संकोचविरहीत समस्यामुक्ती घडून येते.
आणि नातेसंबंध आपसूकच जपली जातात.
▪️प्रेम,जिव्हाळा, मैत्री,नातेसंबंध, समजगैरसमज, वादविवाद, मारामारी खूनखराबा हया गोष्टी पण संवादातूनच घडतात.

#संवाद_हरवण्याची_कारणे
▪️अपेक्षाभंग
▪️अपमान, अन्याय, अहंकार
▪️गैरसमज, दूषित पूर्वग्रह
▪️स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना
▪️द्वेष, सूड, मत्सर
▪️प्रतिकूल प्रतिसाद
▪️खोटेपणा, फसवणूक, भाऊबंदकी
▪️रूक्ष / हुकुमशाहाप्रमाणे  स्वभाव

#संवादातील_अडथळे
▪️नेमक्या शब्दात सांगता न येणे
▪️श्रवणशक्तीच्या मर्यादा
▪️पूर्ण ऐकण्यापूर्वी प्रत्युत्तर
▪️तीव्र शारीरिक वेदनाग्रस्त असणे
▪️राग ,भीती,चिंता,नैराश्य हया नकारात्मक भावनांनी ग्रस्त असणे
▪️मानसिक असंतुलन
▪️स्किझोफ्रेनिया सारखे मनोविकार

#संवादाला_अनुकूल_दृष्टिकोन
▪️I am ok..you are ok
विधायक,निरोगी आनंददायी बालपण,सुजाण पालक असलेल्या 
सुखद अनुभवांनी समृद्ध भावविश्व यामुळे
माणसं आशावादी, वास्तववादी सकारात्मक, चांगुलपणा,सदगुणांवर विश्वास असलेले असतात.
ते स्वतः चा आणि इतरांचा आदर राखत सर्व वयोगटातील व्यक्तीशी सहज संवाद साधतात

#संवादाला_बाधक_दृष्टिकोन
▪️i am ok.  You are not ok
लहानपणी क्षुल्लक चुकांसाठी कठोर शिक्षा आणि प्रेम न मिळाल्याने माणसाला
इतरांबद्दल राग,अविश्वास असतो
त्यामुळे त्यांच्याशी ते सूडबुद्धीने वागतात, दोष,टोमणे मारतात 
अशा लोकांशी संवाद साधण्याची इच्छा होत नाही
▪️i am not ok ...you are ok
पालकांकडून मिळालेली हीनत्वाची भावना ,नकारात्मक बोलणे हयामुळे माणूस स्वतःला कमी समजतो
त्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो
ते सतत कमीपणा घेतात, लाचारीने वागतात.
अशा व्यक्ती बरोबरचा संवाद कंटाळवाणा असतो.
▪️i am not ok...you are not ok
त्रासदायक खराब बालपण,पालकांतील विसंवाद, प्रेमाचा अभाव, मारझोड हयामुळे माणूस हताश, निराश, वैफल्यग्रस्त असतो ,त्याची भावनिक वाढ खुंटलेली असते. आत्महत्येला प्रवृत्त होतात हे समाजापासून वेगळे असतात.

अपूर्ण
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know