दोन वेळा!चार वेळा!
आमचे एक डॉक्टर मित्र आहेत त्यांनी एक पुस्तक ५५ वेळा वाचले आहे....त्याचे नाव म्हणजे "पॅपीलॉन"!
निराशेतून आशेकडे घेऊन जाणारे हे कथानक! जगण्याची आणि टिकून राहण्याची इच्छा निर्माण करणारे हे पुस्तक!जिद्द आणि चिकाटी शिकवणारे हे कथानक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते! अनुवादित पुस्तकांच्या श्रेणीतील हे पुस्तक जर तुम्ही अजून वाचले नसेल तर निश्चितच हा सारांश वाचला पाहिजे!
पुस्तक:पॅपीलॉन
लेखक: 'हेन्ऱी शॅरियर' मराठी अनुवाद:रवींद्र गुर्जर
प्रकाशन: श्रीराम बुक
पृष्ठ:३९० मूल्य:३५०/ सवलत मूल्य:३१०/ टपाल:३५/
एकूण:३४५/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.
ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी:9421605019
पुस्तक परिचयकर्ता:सुमित द दुट्टे.
एका अंधाऱ्या रात्री एका बेटावर, एक तरुण व त्याच्यासमोर दहा- बारा माणसे बसले होते. त्यांच्यामध्ये, समुद्रामध्ये जाण्यासाठी, चांगल्या होडीच्या देवाण घेवाणीचा व्यवहार चालू होता. त्या दहा-बारा माणसाच्या नेत्याने, एका कपात त्या तरुणाला काँफी दिली. कप तरुणाच्या हातात दिल्यावर,
"अरेच्च्या, माझ्या डाव्या हाताच दुसर बोट पण गळून पडलं वाटत.." अस म्हणाला.
त्या तरुणाला कपासोबत काहीतरी असल्याच दिसलं. त्याने ते तपासून पाहिल तर ते हाताच 'बोट' होत. तरुणाने ते बोट त्या नेत्याकडे दिल. त्याने शिल्लक सिगारेटच बुड जस चुलीत टाकतात तस, एकदम काहीच झाल नाही अश्या स्थितप्रज्ञ भावाने, ते चुलीत टाकुन दिलं. थोड्यावेळाने मांस जळाल्याचा वास आला.
तिथे उपस्थित ते दहा बाराजण 'कैदी' होते, पण सजा चालू असतानाच त्यांना 'महारोग' झाल्यामुळे त्यांची व्यवस्था दुसऱ्या बेटावर केली होती. तिकडे कोणीही येत नसत. तेव्हा त्याच्याकडुन पळुन जाण्यासाठी चांगली होडी मिळविण्याकरिता, दुसऱ्या बेटावरिल तरुण पळुन ह्या बेटावर आला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++
तुझ्याविरुद्ध कुठलाही 'भक्कम' पुरावा नाहीये. त्यामुळे आपण निर्दोष सुटू. ह्या वाक्यावर, मुळात पंचवीस वर्षीय असलेला ,पण नेमकीच अंघोळ व दाढी केल्यामुळे विसवर्षीय वाटावा, अशा तरुणाला थोडसं हसु आल. जणु, त्याला शिक्षा झाली तर हा वकिलही त्याच्यासोबत शिक्षा भोगणार होता...? काही क्षणात, त्या तरुणाच्या जिवण मरणाचा निकाल लागणार होता. तरीही त्याची विनोदबुद्धी जागृत होती.
त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होता. त्यासाठी 12 जणाचा एक निर्बुद्ध 'पंच टीम' नियुक्त केलेली होती. त्या टिममधल्या सर्वाना, त्या तरुणाने घातलेले नविन कपडे आवडलेले नव्हते. एक सरकारी वकिल, ज्यांने फक्त आरोपीला मृत्युदंड किंवा किंमान जन्मठेप मिळावी, ह्यासाठी त्याचं तरुणपण अभ्यासात खर्ची केल होत. ह्याची सरकारतर्फे नियुक्ती केलेली होती.
तरुणाने, कितीही, गुन्हा न केल्याच सांगीतल, तरी तो सरकारी वकिल त्या पंचाना मुर्ख बनविण्यात यशस्वी झाला होता. तरुणाला त्याने न केलेल्या गुन्हाबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
त्या तरुणाला अगोदर फ्राँन्समधील जेल मध्ये व नंतर बोटीने देशाबाहेरील एका बेटावर पाठविण्यात आल होत. ह्या दोन्हीही जेलमध्ये 'पैशाने' बरेच काम होत असत, म्हणून त्या तरुणाने त्याच्या पत्नीकडुन फ्राँन्समध्येच पाचहजार सहाशे रुपये मिळवले होते. चार्जरसाऱख्या तीन इंची डबीमध्ये त्याने ते आपल्या 'पार्श्वभागा'मध्ये लपवून ठेवले होते. पुढे एका जेलमध्ये, मित्राचे पैसेही त्याने आपल्या गुप्तभागात लपविले. एकाच वेळी दोन दोन चार्जर त्याच्या शरिराचे अविभाज्य अंग बनले होते. 'नग्न' करुन पोलीस झटती घेत असत, तेव्हा त्यांना ते मिळु नये म्हणुन त्याला ती पेटी जास्तीत जास्त आत घेणे भाग होते. त्यासाठी तो नेहमी मोठ्याने श्वास घेत असे.
त्याला जेलमध्ये सुरवातीला 'देगा', नंतर 'ज्युलेट' 'जोन्स' व 'मँरियेट' नावाचे मित्र झाले होते. त्यातील 'ज्युलेट' एकटाच पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तर 'देगा' ने ऐनवेळी कच खाऊन पळून जाण्याच रहित केल होत. पण, तो तरुण, 'जोन्स' व 'मँरियेट' एका रात्री त्या पहिल्या बेटावरुन तुटक्यामुटक्या होडीने पळून जाण्यात यशस्वी होतात. (पुढे चांगल्या बोटीसाठी 'महारोग्याच्या' बेटावर जातात.)
समुद्रात वादळाला तोंड देत देत ते 'त्रिनिनाद' ह्या छोट्याश्या बेटावर पोहचतात. तिथे माणुसकीने ऊतपोत भरलेल्या एका परिवारासोबत व लोकांशी ह्या गुन्हेगारांचा संबध येतो. गुन्हेगार आहेत हे माहीत असुनही त्या बेटावरील सर्वजण त्यांना माणुसकीची वागणूक देतात. येथून निघतानाच, ह्यांच्या अगोदर फ्राँन्समधून पळुन आलेले पण, भरकटलेले तीन इतर फ्रेंच कैदी त्यांच्यासोबत येतात.
पुढील प्रवासात ते सर्व 'सहा'जण भरकटुन 'डच' बेटावर कैद होतात. पण, त्या बेटावरील लोकं चांगले असतात. ते त्यांची योग्य चांगली होडी, सर्व साहित्य देऊन पुन्हा सोडुन देतात.
पण, त्रिनिनाद वरुन सोबत असलेले नवे मित्र मात्र समुद्राला, त्याच्यातील वादळाला घाबरलेले असतात. व ते त्यांना कुठेतरी उतरवण्यासाठी तगादा लावतात. तेव्हा नाईलजाने त्या तरुणाला होडी किनाऱ्यावर आणावी लागते. पण, ती कोलंबियातील एक खेड असत. दुदैव..!! तिथे त्यांना पुन्हा कैद होते. एकदम रानटी लोक. गलिच्छ वातावरण..! अशा वातावरणातूनही आपण पळून जाऊ शकतो, म्हणून, तो त्याच जेलमध्ये खितपत पडलेल्या एका कैद्याला हाताशी धरुन 'रेड इंडियन' कडे पळून जाण्याचा निर्णय घेतो. वाटेत पडणारा पाऊस, उंच उंच गवत, ओबड धोबड रस्ते, समुद्र किनाऱ्यावरील वाळुत असेलेले कासवाचे अंडे खात-खात ते 'रेड इंडियन' भागात असलेल्या एका आदिवासी खेड्यात पोहचतात.
कमरेच्यावर नग्न असलेले स्त्री-पुरुष, गवताच्या झोपड्या, समुद्रातून मोती आणि कासव पकडण्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या जमातीत तो तरुण अडकतो. इथल्या दोन सख्या बहिणी 'लाली आणि झामरोया' ह्या त्याच्या पत्नी होतात. नुसत्या पत्नीच होतात अस नाही, तर त्या दोघीही त्याच्या मुलाच्या आई बनणार असतात. येथे तो तरुण जवळ असलेल्या साहित्याद्वारे त्या प्रमुखाच्या व इतर स्त्री-पुरूषाच्या अंगावर 'चित्र' काढतो. त्यांच्या मुख्य वैद्याच्याच अंगावरील जखम आधुनिक उपचाराने नीट करतो..!!
नंतर, तो त्या सर्वांची 'जेव्हा जमेल, जसं जमेल तस परत येण्याच्या आश्वासनावर' रजा घेतो. ह्या जमातीच्या प्रमुखाचे वडिल त्याला 'सान्ता मार्ता' पर्यंत सोडायला येतात.
वाटेत, त्यांना 'नन' चा टांगा भेटतो. त्या त्याला लिफ्ट देतात खरं, पण, त्यांची प्रमुख त्याला धोका देऊन पोलीसाला कळवते. पुन्हा अंधारकोठडीत! गंमत, म्हणजे, त्याचे पुर्वीचे पाचही मित्र अगोदरच ह्या जेल मध्ये खिचपत पडलेले असतात. हि आतापर्यंतची सर्वात भंयकर कोठडी होती. कारण, येथे समुद्राच्या भरतीच्या दोनही वेळी 'अंधारकोठडीत कमरे ऐवढे पाणी शिरायचे'. पाण्यापासून भिजू नये म्हणून लोखंडी गजाला धरुन खाऱुताई सारख अलगद लटकाव लागे. पाणी निघून जाई ,पण मातीचा थर, विविध समुर्दी जीव, कचरा नंतर साफ करत बसावा लागे. कुठलाही कैदी आठ महिन्यापेक्षा जास्त ह्या कोठडीत जिंवत राहु न शकल्याच त्या कोठडीच स्वत:च रेकार्ड होतं.
येथील 'गव्हर्नर' पासुन 'कैद्यापर्यंत' सर्व एकापेक्षा एक भ्रष्ट होते. लाली आणि झामरोयाने दिलेल्या 'मोती आणि सोन्याच्या नाण्याचे' रुपांतर 'पिसो' मध्ये करुन तो तरुण गव्हर्नरलाच विकत घेऊन होडीची व्यवस्था करतो. पण, ऩशीब अस कि अंदाजाप्रमाणे पाऊस न पडल्याने सर्व बेत फसतो.
त्यांची, तेथूनच जवळच असलेल्या सुसज्च जेलमध्ये स्थलांतरित केले जाते. त्याच वेळी फाँन्समधून एक जहाज ह्यांना घेण्यासाठी निघाल्याची वार्ता येते. ते जहाज येथे पोहचण्यापुर्वी पळण गरजेच असत म्हणून तो तरुण, शिपायाला विकत घेतो. काँफीमधून, शिपायाला झोपच औषध देतो. पण, तरुणाच नशीबच फुटक..!! औषधाचा त्या सैनिकावर योग्यवेळी परिणाम होत नाही. अन् गस्त बदलल्यावर, दुसऱा सैनिक आल्यावर, तो पहिला सैनिक सलग तीन दिवस चार रात्र झोपतो. :) नंतर, 'डायनामायिट' लावून भिंतीला भगदाड पाडण्याचा बेत केला जातो. सर्व योजना यशस्वी होतेही, पण, त्या स्फोटामुळे भिंतीला केवळ तडा जातो. भगदाड पडत नाही. हे सर्व करण्यासाठी त्याला त्याच गावातील सर्व 'फ्रेन्च वेश्या'ने पाचहजार पिसोने मदत केलेली असते.
ह्या गडबडीत, फाँन्सच जहाज येतं. त्यांना कैद करुन परत फ्राँन्सकडे परत घेऊन जाताना, शेवटचा प्रयत्न म्हणून रस्त्यात त्रिनिनादला एका इंग्रज अधिकाऱ्याच्या थोबाडीत देतो..! पण, पुन्हा दुर्दैव..! तो अधिकारी अधिकचाच क्षमाशील निघतो. केलेल्या गुन्हाबद्दल त्याला लगेच क्षमा करतो.
पुन्हा फ्राँन्सच्या त्याच जेल मध्ये आणल्या जात जेथून त्यान पलायनाला सुरवात केली होती. ह्यावेळी त्याच्या पायात बेड्या घालून त्याला वेगळ्या कैद्यामध्ये ठेवल्या गेल होते. ते कैदी म्हणजे एकापेक्षा खतरनाक आणि क्रुर..!! त्यातल्या दोन कैद्याने, त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या 'अरबाने' मधमाश्याच्या पोळं अंगावर टाकुन छळ केला होता म्हणुन, 'ईट का जबाव पत्थरसे' म्हणून त्या दोन कैद्यांनी त्या अरबाला जखमी करुन मांस खाणाऱ्या मुंग्याच्या हवाली केल होत. त्या अरबाला पूर्ण मरायला एक रात्र आणि दोन दिवस लागले होते. तोवर मुंग्यानी त्याच्या डोळ्यासहित पूर्ण शरीर वारुळात लंपास केल होत.
पळुन जाण्याच्या गुन्हामुळे त्या तरुणाला दोन वर्ष सेंट जोसेफ नावाच्या 'नरभक्षक' बिरदावली असलेल्या जेल मध्ये एकांतवासाची शिक्षा ठोठावण्यात अाली. ह्या दोन वर्षात फक्त चार वेळा त्याच इतरांशी संभाषण झाल होत.
दोन वर्षानंतर, तो तरुण तर स्वत:वर मानसिक आणि शारिरीक ताबा सांभाळू शकला होता, पण त्याचे दोन मित्र एकदम कृश झाले होते. त्यातील 'जोन्स' ची तर स्टेचरवरच सुटका झाली. व तो मुक्त झाल्यावर पाच-सहा दिवसातच देवाघरी गेला. त्याचा पार्थिव देह बाजूच्या समुद्रातील 'शार्क'च्या पोटात शांत झाला..!!
समुद्राच्या मध्यभागी एक बोट काही वेळ थांबली. त्यातील सहा सैनिकांनी त्या होडीत पोत्यात गुंडाळुन ठेवलेल्या प्रेताला दगड बांधला, व ते प्रेत समुद्रात फेकुण दिल. दगडामुळे ते तळाशी जाईल हा त्यांचा गैरसमजच ठरला. कारण, पाण्यात पडल्या पडल्या 'शार्क' एकमेकावर पडुन त्या प्रेताला खात होत्या. डोळ्याची पापणी लवे पर्यंत सर्व शांतही झाल होत. त्या तरुणाचा पळून जाण्याचा डाव त्या पोत्यातील 'प्रेतामुळे' एकदम शेवटच्या क्षणी फसला होता. त्यामुळेच त्या तरुणाने त्याला यमसदनी पाठवलं होत.
एक..दोन.. तीन... चार.. पाच.. अबाउट टर्न एक.. दोन.. तीन.. चार.. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असे बारा तास तो तरुण दहा बाय दहाच्या अंधाऱ्या कोठडीत चालत असे. त्याच्या हत्येच्या गुन्हामुळे त्याला परत एकदा आठ वर्ष एकांतवासाची शिक्षा मिळाली होती.
सर्व कैद्याला रोजच्या प्रमाणं बकिटभरुन 'सुुप' आल होत. तो तरुण उठला. आणि, "हे ह्यामध्ये मीठ घालायचचं विसरलेतं" अस म्हणत सर्व कैद्यासमोरच त्यात मुतला. आणि, तेच 'सुप' त्याने मगात घेऊन सर्वासमोर पिऊन ही टाकल. हे सर्व त्याला 'वेडं' व्हायच होत म्हणून त्याने मुद्दाम केल होत. कारण, वेड्याला पळुण जाण, खून करणं सर्व माफ असतं अस त्याच्या एका मित्राने त्याला सांगीतल होत. वरिल पराक्रमामुळे साहजिकच त्याला रुग्णालयात भरती करावं लागल. त्याचा एक हेतू साध्य झाला होता. वेड बनून पेडा खाण्याच्या प्रयत्नात म्हणजे पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा अजून एक साथीदार मेला.
एका बेटाच्या किनाऱ्यावर, त्याचा मित्र कमरेएवढ्या चिखलात रुतल्या गेला होता. आणि तो तरुण आपल्या तराफ्यावरुन त्या चिखलात, त्याच्याकडे जाऊ पहात होता. त्या बरोबर पाठीमागून एक जोरात लाट आली. तो तरुण पंधरा वीस यार्ड अापल्या मित्राकडे ढकलल्या गेला असेल, पाण्यामुळे चिखल मऊ झाल्याच त्याच्या हाताला जाणवलं आता आपण मित्राजवळ लवकर पोहचू शसतो. असा त्याच्या मनात क्षणभर विचार आला.. पण त्याचा मित्र एकदम दिसेनासा झाला. तो पूर्ण चिखलात गाडला गेला होता. शेवटचा 'गुडबाय' करायला त्याला 'हात'ही वरी करता अाला नव्हता..
वेड्याच सोंग करुन पळून जातानाही असाच एका मित्राला प्राण गमवावा सागला होता, त्यामुळे तो तरुण दुसऱ्या बेटावर आणल्या गेला होता. येथे तो व त्याच्या दुसऱ्या मित्राने नारळाच्या पोत्यावर पळुन जाण्याची योजना आखली. व ती काही अंशी सफलही झाली. दुसऱ्या मित्राने थोडी घाई केली नसती तर, तो व त्याचा मित्र त्या 'चीनी कँम्प' असलेल्या बेटावर सुखरुप पोहचणार होते. तिथे पुढील प्रवासासाठी मदत मिळणार होती.
पुर्वी सांगीतल तसचं चिखलाच बेटं. त्यावर विटाची भट्टी पेटलेली होती. तो तरुण झोपडीतून बाहेर आला. थोडी थंडी वाजत होती म्हणून तो त्या भट्टीजवळ शेकायला बसला. भट्टीकडे पाहतो तर अवाक् होऊन पहातच राहतो. भट्टीमध्ये त्याला सहा पाय, बुटासहित जऴताना दिसत होते. ती भट्टी, त्याच्या चिनी कैदी मित्राचा भाऊ 'कुक-कुक'ची होती. व त्याच्याबरोबरच तो पुढचे पलायन करणार होता.
पुढे तो तरुण यशस्वी होतो का..? कि त्याच्या नशीबात अजून काही वाढुण ठेवलेल असत..? पुढे कुठल्या देशात त्याला स्वातंत्र्य मिळेल..?
एका दुर्दैम्य इच्छाशक्ति असलेल्या साहसी कैद्याची ही साहसी 'पलायनकथा' जीवनात येणाऱ्या सततच्या अपयशाला स्वीकारुन त्याच क्षणी 'पुनश्च: हरि ॐ' करण्याची चिकाटी, एकदा मनात बसल कि ती गोष्ट तडीस नेणे व इतरांनी कधी स्वप्नातपण विचार केला नसेल तसे धाडस करणे, तो मार्ग स्वीकारणे 'पाँपीलाँन' कडुन सर्व वाचकांने शिकण्यासारखे आहे...!
फ्रान्समधील 'हेन्ऱी शँरियर' ह्या मुळ (कैदी) लेखकाची हि पलायनकथा श्री रविंद्र गुजर ह्यांनी अनुवादित केलेली आहे. वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक आहे...! नक्कि वाचा..!!
पुस्तक परिचयकर्ता:सुमित द दुट्टे.
टिप: या पुस्तकाचा पुढील भाग :बँको मूल्य:१५०/ उपलब्ध आहे .
विशेष सवलत: दोन्ही पुस्तकं एकत्र खरेदी केल्यास:४७५/ मध्ये होम डिलिव्हरी!
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know