WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Tuesday, October 12, 2021

अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे

मनं उलगडताना
      लेखक: डॉ. विजया फडणीस
    प्रकाशन : रोहन प्रकाशन

लेखमाला : भाग तिसरा

अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे 

   न्यूनगंड मनात घेऊन मोठी झालेल्या मुलांच्या मनात नकारात्मक भावनांचे पोषण झालेले असते 
त्यांचा स्वतः कडे ,इतरांकडे आणि परिस्थिती कडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक झालेला असतो. 
अशावेळी मानसशास्त्रीय चाचण्याद्वारे त्याला त्याचे विचार, भावना वर्तन यातील कच्चे दुवे आणि त्यातील त्रासदायक गोष्टींची जाणीव होते, 
कारणमीमांसा केल्यावर विचारातील फोलपणा समजतो.
स्वतःच्या क्षमता मर्यादांची जाणीव ठेवून तसेच स्वभावदोष दूर करून मनातील नकारात्मकता कमी करून परिस्थिती आवाक्याबाहेर नसेल तर बदल करून अन्यथा ती मान्य करून अस्वस्थता टाळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो.

अस्वस्थतेला कारणीभूत गोष्टी
1.भूतकाळात घडलेल्या गोष्टी सतत उगाळत राहण्याची सवय
2.स्वतःच्या जाणिवांचा अभाव आणि नकारात्मकता
3.वास्तव स्वीकारण्याची तयारी नसणे
4.स्वतःच्या पाँझिटीव्ह निगेटिव्ह गोष्टीबद्दल कुठलीही माहिती नसणे
पाँझिटीव्ह गोष्टी (कष्टाळूपणा,समजूतदारपणा, समाधानी वृत्ती संयमीपणा..इत्यादी)
निगेटिव्ह गोष्टी (हट्टीपणा, संशयखोर, लाजाळूपणा, बालिश, आरंभशूर ... इत्यादी )
5.आपल्या क्षमतांबद्दल जागरुक नसणे

अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे प्रवास करताना महत्त्वाचे समुपदेशन तंत्र पडते ते म्हणजे #REBT (Rational Emotive Behavior Therapy) अर्थात विवेकनिष्ठ भावोपचार पद्धती
या तंत्रात विचार, भावना ,वर्तन बदलण्यासाठी आनुवंशिकता आणि परिस्थितीनुरूप मानसिकता समुपदेशनाने बदलतात
ज्यामुळे माणसाला चांगल्या वाईटाची जाण येते 
भावनांच्या आहारी न जाता परिणामांचा विचार करून समस्यांना सामोरे जाण्याची नवीन दृष्टी मिळते

या तंत्रानुसार स्वभाव बदल करण्याची पंचसूत्री:
1.घटना (अपयश) 
2.विचार (नकारात्मक स्वगत)
3.घटनेचा भावनिक परिणाम (नैराश्य)
4.स्वगताला आव्हान (समुपदेशनाने विवेकी विचारांची पेरणी आणि विघातक नकारात्मक भावना बदलणे )
5.परिणाम (यशाकडे वाटचाल)

स्वगताबाबत सांगायचे झाल्यास माणसाच्या मनात तीन चुकीच्या कल्पना दुःखास कारणीभूत ठरतात
1.मला नेहमीच यश मिळाले पाहिजे
2.मला सर्वांनी चांगले म्हणावे
3.माझे आयुष्य सुखातच जावे

यश,प्रशंसा, सुख हयाबाबत माणसाचा अट्टहास दूर सारला की माणूस समाधानाने जगू शकतो.
समाजातील प्रत्येक जणाने आपल्यावर प्रेम करावे ही गोष्ट स्पृहणीय असली तरी अत्यावश्यक नाही.
दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना शासन व्हावे पण त्यांच्या चुकांमागची कारणे तरी समजून घ्यावी.
सगळयाच गोष्टी मनासारख्या होणे शक्य नाही त्यामुळे अटळ वास्तवाचा स्वीकार होणं गरजेचं आहे
दुखाला परिस्थिती पेक्षाही दृष्टिकोन जास्त जबाबदार आहे.
समस्यांपासून पळून न जाता,चिंता न करता आल्या प्रसंगाला तोंड देणं इष्ट.
भूतकाळातील घटना विसरून त्यातील धडा लक्षात ठेवणं.
स्वतःच्या चुकांबद्दल अपराधीपणाची भावना बाळगण्यापेक्षा त्यांची शक्यतो दुरूस्ती करण्यावर भर द्यावा.
जीवनातील प्रत्येक समस्येवर उत्तर असते पण आपण ते फक्त शोधायला हवे.
सुख म्हणजे निरूद्योगी आणि निष्क्रिय असणे नाही तर कार्यात गढून समाधान मिळवणं.
मनातील वैरभाव माणसाला सुखी बनवू शकत नाही.
आपला आनंद ,समाधान, सुख फक्त आपल्यावरच अवलंबून असते याची सदैव जाणीव ठेवून त्यासाठी परावलंबी होणे नाही.
आपल्या विचारांमागे दडलेल्या नकारात्मक अविवेकी धारणा, त्रासदायक विचार हयांचे समूळ उच्चाटन करत शास्त्रीय, वास्तववादी, विवेकपूर्ण विचार आत्मसात करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

अपूर्ण

#मन_उलगडताना 
#वाचनवेडा 
#मराठी 
#ज्ञानयज्ञ
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know