Friday, August 27, 2021

यशोशिखरावर भेटूया ( See You at the top )

यशोशिखरावर भेटूया ( See You at the top )
              लेखक - झिग झिगलर
             अनुवाद - सायली गोडसे
       प्रकाशक - मंजुल पब्लिशिंग

यशोशिखराकडे जाणारी चौथी पायरी
#दृष्टिकोन

दृष्टिकोन म्हणजे मनाची ठेवण किंवा हेतू साध्य करण्यासाठी विचारांची स्थिती

#दृष्टिकोनाचे_महत्त्व
आपल्याकडे ज्ञान कौशल्य विशेष योग्यता असेल तरीही योग्य दृष्टिकोन नसेल तर हे सारे काही व्यर्थ आहे
  आजही आपल्या शिक्षणव्यवस्थेत पाठांतर आणि कौशल्ये शिकवण्यावरच भर देतात जे यशासाठी फक्त 20% जबाबदार आहे पण 80% जबाबदारी योग्य मांइडसेट किंवा आशावादी दृष्टिकोन यांची आहे

#योग्य_दृष्टिकोन_कसा_असावा
स्वतः वर ,स्वतःच्या कामावर आणि देवावर ठाम विश्वास, 
यश मिळणारच हा आत्मविश्वास, समाजासाठी काहीतरी करण्याची भावना, सकारात्मक वृत्ती, 
संकटावर मात करण्याची जिद्द , 
मंदीत संधी शोधण्याची नजर,
संधीचे सोने करायची विजिगुषु वृत्ती, 
आपल्या हातून काहीतरी महान कामगिरी होणार हा विश्वास, 
सतत ज्ञान मिळवण्यासाठी आतुरता, नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक राहण्याची जिद्द,
 पराभवाला तात्पुरता मानून पुन्हा नव्याने जिंकण्याची संधी शोधण्याची तयारी
सतत सकारात्मक लोकांच्या सहवासात रममाण,
स्वतःच्या भावनांवर नियंत्रण,
सदा आनंदी ,उत्साही, उल्हसित कार्यप्रवण

#चुकीच्या_दृष्टिकोनाचे_तोटे
निराशावादी ,
नकारात्मक विचार
परिस्थितीवर अवलंबून निर्णय,
सतत दुसऱ्यांकडून अपेक्षा,
नशिबावर अवलंबून,
जिंकण्यापूर्वीच माघार,
तात्पुरता दिखाऊ उत्साह,
कष्ट टाळण्याची आरामदायी वृत्ती,
सतत कारणे सांगून जबाबदारी टाळणे,
स्वतःला कमी लेखणं,
सतत वाईटाचीच कामना ,

#योग्य_दृष्टिकोन_कसा_आणायचा
दिवसाची उत्तम सुरूवात
देवाचे,अन्न पुरवणाऱ्याचे,सेवा पुरवणार्याचे सार्याचे आभार माना
अडथळयांमुळे वैतागून न जाता सकारात्मक विचार
आपल्यावर हसणारया लोकांना मनावर न घेणं
शरीराप्रमाणे मनाची भूक भागवण्यासाठी प्रयत्न 
डोके कधीही  रिकामे न ठेलणे
सतत कार्यप्रवण असणे
मन स्वच्छ ठेवणे
आपल्या शब्दकोशातून नकारात्मक शब्दांना हद्दपार करत सकारात्मक शब्दांचा भरणा
सकारात्मक व्यक्ती आणि विचारांच्या नित्य सहवासासाठी पुस्तके , आँडिओबुक, चर्चासत्रे ,सेमिनार यांना हजेरी
वाईट सवयींना चांगल्या सवयीत बदलण्याची तयारी आणि त्यासाठी सुप्त मनाचा यथायोग्य वापर

Nilesh Shinde 
अपूर्ण

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know