WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Wednesday, August 25, 2021

फोकल पॉईंट

फोकल पॉईंट

फोकल पॉईंट म्हणजे जगभरातील वैयक्तिक व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम कल्पना आणि योजनांचे एकत्रीकरण आहे. महत्वाचे म्हणजे ब्रायन ट्रेसी यांनी हे खूपच सोप्या पद्धतीने मांडले आहे, हे  आपल्याला आपल्या जीवनात अगदी सहजपणे वापरता येईल. आपल्याला जर संपूर्ण संतुलन आणि मन:शांती मिळवायची असेल तर जीवनाची जी खाली दिलेली सात महत्त्वाची क्षेत्रं आहेत, या क्षेत्रांमध्ये मध्ये आपलं जीवन कसं संघटित आणि सोपं करायचं, याचा मार्ग फोकल पॉईंट आपल्याला दाखवतो.
सात क्षेत्र:-
१) व्यवसाय आणि करिअर
२) कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन
३)पैसा आणि गुंतवणूक
४) आरोग्य आणि तंदुरुस्ती
५) वैयक्तिक विकास
६) सामाजिक उपक्रम
७) आध्यात्मिक विकास आणि आत्मशांती.
         वरील सात क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी फोकल पॉईंट प्रोसेस या पुस्तकात सांगितली आहे.ही फोकल पॉईंटची पद्धत प्रत्येक भागातील सात पायऱ्यांद्वारे काम करते. या सात पायऱ्यांमुळे आपल्या वैयक्तिक धोरणात्मक नियोजनाची एक सिस्टीम तयार होते.ज्यामुळे आपल्याला अचूकपणे हे समजतं की, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील फोकल पॉईंट कोणता आहे. त्यावर एकाग्रतेने काम करायचं.
 ते सात भाग म्हणजेच
१) आपली मूल्यं किंवा सिध्दांत
२) व्हिजन
३) ध्येय
४) ज्ञान आणि कौशल्य
५) सवयी
६) दैनंदिन कामे
७) कृती
        आपल्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील ध्येयं कशी ठरवायची आणि त्यांचा पाठपुरावा कसा करायचा हे या पुस्तकात दिले आहे. याचबरोबर
*८०/२० चा नियम ,
* स्लॅम (SLAM) फॉर्म्युला,
*ABCDE मेथड,
*लॉ ऑफ कॉम्प्लेक्सिटी,
*7R कन्सेप्ट,
*७ पायऱ्यांचा मेंटल फिटनेस प्रोग्राम, 
या सर्वांचा आपल्या जीवनात प्रभावी वापर करून यशस्वी होता येईल.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लेखक:ब्रायन ट्रेसी
किंमत २५०/-
संपर्क: ९८८११८६६६३(व्हाट्सअप)

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know