WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Wednesday, August 4, 2021

मनाची शक्ती कशी वापराल

मनाची शक्ती कशी वापराल

🍁 जे तुमच्या मनात तेच तुमच्या जगात 🍁
   'तुम्हाला त्या गोष्टी कधीच प्राप्त होत नाहीत, ज्या प्राप्त होण्यासाठी तुम्ही लायक असता. उलट, तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील असा तुमचा विश्वास असतो.' हे वाक्य जेव्हा मला पहिल्यांदा समजलं त्यावेळेस मला धक्काच बसला. म्हणजेच मला जगातील सर्व गोष्टी मिळायला हव्यात, मी त्यासाठी लायक आहे; फक्त मला त्या गोष्टी मिळू शकतील हा विश्वास नसल्यामुळे त्या गोष्टी मिळत नाहीत.
      असंच आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती ही जगातील सर्व चांगल्या गोष्टी मिळण्याकरता लायक आहे. प्रत्येकाला चांगलं आरोग्य, चांगलं शरीर वैभव, संपन्नता मिळायलाच हवी. त्यासाठी ते लायक आहेत. परंतु या सर्व चांगल्या गोष्टी मला मिळतील, असा विश्वास त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्या गोष्टी त्यांना प्राप्त होत नाहीत. मग प्रश्न येतो, की स्वतःवर कुठलीही शंका न येऊ देता मला या गोष्टी मिळतील असा विश्वास कसा तयार करायचा?
 'मनाची शक्ती कशी वापरावी' हे पुस्तक त्याला समाधानकारक उत्तर देऊन जाईल. आपलं मन कसं कार्य करतं, आपल्या मनाचा योग्य वापर कसा करून घ्यायचा, त्याच्या शक्तीचा वापर कसा करून घ्यायचा, या गोष्टी प्रत्येकाला खरं तर त्याच्या लहान वयातच कळायला हव्यात. प्रत्येक आई-वडील जसं आपल्या मुलाला चालायला शिकवतात, लिहायला शिकवतात, वाचायला शिकवतात, उपलब्ध असलेल्या शक्तीचा कसा वापर करायचा हे शिकवतात तसंच प्रत्येक लहान मुलाला त्याच्या लहानपणीच त्याच्या मनाची शक्ती कशी वापरायची हेही कळायला हवं. याचं शिक्षण खरं तर शाळेतच असायला हव. ही शक्ती कशी वापरायची, याचे शिक्षण नसल्यामुळे अनेकजण आपल्याच मनाविषयी तक्रार करतात- माझं मन लागत नाही, मी एकाग्र होत नाही, अनेक कामांमध्ये माझं मनच बाधा तयार करतं. अनेक आध्यात्मिक लोक तर मनच सर्वात मोठी बाधा आहे, असं सांगत मनालाच शत्रू मानतात. याच मनामुळे आपली चैतन्यशक्ती आपल्यापासून लपली आहे, असं त्यांचं मत असतं.
    खरं तर आपल्याला मन नसेल, आपल्याला भावना नसतील तर आपल्यामध्ये आणि यंत्रामध्ये काय फरक राहिला? माणूस म्हटलं, की भावना आल्याच. माणूस म्हटलं, की मन आलंच.
      या भावनांचा, या मनाचा, या शक्तीचा योग्य दिशेने कसा वापर करायचा हे माहीत नसल्यामुळे अनेकांना बाधा वाटतं. पण याचा जर योग्य वापर केला गेला तर जगातील सर्वोत्तम गोष्टी अत्यंत सहजतेने आपण आपल्याकडे आकर्षक करू शकतो. मग त्या शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक भागातील असतील किंवा अध्यात्मातील उच्च अनुभव प्राप्त करून घ्यायचा असेल, या सर्वांसाठी मनच अतिशय उपयोगी सिद्ध होतं.
   हे कसं घडतं हे एका उदाहरणाने समजून घेऊ या. अग्नी जेव्हा अनियंत्रित असतो तेव्हा फार मोठा संहार घडवतो. पण हाच अग्नी नियंत्रणात असतो, त्याला जेव्हा योग्य दिशा दिली जाते त्या वेळी अनेक रॉकेट अंतराळात, आकाशात झेपावतात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या अग्नीच्या शक्तीमुळे सहजतेने पूर्ण होताना दिसतात.
   आपल्या मनाचेही असेच आहे. यासाठी फक्त ही शक्ती कशी वापरायची हे जाण्यासाठी आपल्याला रहस्य कळायला हवीत. या पुस्तकात मनाची शक्ती जाण्यासाठी तीन रहस्यं दिली आहेत. आणि शक्तीचा योग्य दिशेने वापर करायचा, यासाठी सात सिद्धांत आहेत तर अकरा नियम आहेत. एकदा आपल्याला रहस्य कळली की सिद्धांत आणि नियम आपोआप समजायला लागतील.
    सिद्धांत सांगतात, की तुम्हाला ज्या गोष्टी प्राप्त करायचे आहेत त्या प्राप्त करण्याची गणित काय? तर नियम सांगतात, की फक्त तुम्ही मनाच्या शक्तीचे नियम पाळलेत तर तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी नक्की पोहोचाल. पण नियम पाळले नाहीत तर मात्र तयार होईल. निसर्ग हा जसे कर्म तसे फळ देतो. आगीत कोणी हात घातला तर त्याचे बोटे भाजणारच. त्याचा हात भाजणारच; मग तो एखादा साधू असेल, संन्यासी असेल, वृद्ध असेल, लहान बालक असेल किंवा एखादा चोर असेल. सर्वांना नियम सारखेच असतात त्यासाठी नियम जाणणं अत्यंत आवश्यक आहे.
  रहस्ये, सिद्धांत आणि नियम झाल्यानंतर तुमच्या मनाच्या शक्तीचा अत्यंत सहजतेने वापर करणं तुम्हाला शक्य होईल.
   या पुस्तकातील रहस्ये, सिद्धांत, नियम जाणून तुमच्या मनाच्या शक्तीद्वारे, खरं तर तुमच्याच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या ही लोकांच्या जीवनात ऊर्जा चैतन्यशक्ती तुम्ही जागृत करू शकाल. यासाठी पुस्तक जरूर वाचा. या पुस्तकातील काही ठळक मुद्दे.....
* मन कुठे असते आणि कसे काम करते?
*शब्दांची शक्ती
* विश्वासाचे सामर्थ्य
* हवे ते कसे मिळवाल?
*आकर्षणाचा नियम
*मनाचे प्रोगॅमिंग
*स्वयंसूचना- विचारशक्ती
*मनाची शक्ती कशी वापरावी.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लेखक : मनोज अंबिके
प्रकाशक: मायमिरर पब्लिशिंग हाऊस.
किंमत: १७५/-
Mahesh

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know