Tuesday, June 22, 2021

द_ग्रेटेस्ट_सेल्समन_इन_द_वर्ल्ड भाग 1

#द_ग्रेटेस्ट_सेल्समन_इन_द_वर्ल्ड
(जगातील सर्वोत्तम विक्रेता)

          लेखक : आँग मँन्डिनो
        अनुवाद : राजेश आजगावकर
       प्रकाशन : जयको पब्लिकेशन

लेखमाला: भाग पहिला

लेखकाविषयी :
आँग मँन्डिनो हा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होते .त्यांच्या आईचे स्वप्न होते की आपल्या मुलाने मोठ्ठा लेखक व्हावे
त्यासाठी अगदी पहिलीत जायच्या आधीपासूनच त्यांना वाचनालयातून पुस्तके आणून द्यायची 
माध्यमिक शाळेत जाईस्तोवर ते लघुकथा लिहत आणि शाळेच्या हस्तपुस्तिकेचे संपादक होते.
माध्यमिक शिक्षणानंतर मोठ्या विद्यापीठात जाऊन शिकायचे , मोठा पत्रकार आणि उत्तम लेखक व्हायचे हे मुलासाठी आईचे स्वप्न होते.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते, एके दिवशी स्वयंपाक घरात आई जी कोसळली ती पुन्हा उठलीच नाही.......
त्या धक्क्यातून सावरायला कित्येक वर्षे लागली ,तोवर सगळी स्वप्ने विरून गेली होती.
महाविद्यालयीन शिक्षणाऐवजी लेखक कागदाच्या कारखान्यात कामाला आणि पुढे आर्मीत बाँम्बर असा जीवनप्रवास झाला.
युद्ध संपल्यावर घरी परतल्यावर कुणीही बाँम्बर ला काम द्यायला तयार नव्हते, कित्येक महिन्याच्या बेकारीनंतर एका विमा कंपनीच्या विक्रेत्याची नोकरी कशीबशी मिळाली.. लग्न झाले
पण दुर्देवाचे फेरे अजूनही संपले नव्हते
अपार कष्ट करूनही संसारात पैसा पुरत नव्हता. कर्जाचा बोजा दिवसेदिवस वाढत होता.
कर्जाच्या ओझ्याबरोबर लेखक निराशेच्या अंधकारात खोलवर जात होता. मग डोक्यावरचे टेन्शन जाण्यासाठी दारूचा गुत्ता जवळचा झाला. आणि तोही आपला हक्क वाटू लागला.
पेग वाढत गेले आणि मग रोज कुठल्यातरी गटाराजवळ रात्र सरून जायला लागली. लेखकाच्या वर्तणुकीला कंटाळून बायको मुलीला घेऊन कायमचे घर सोडून गेली.
निराशेचा अंधकार अजूनच दाट झाला होता
जीवन जणू नरकच बनला होता.
निराशा ,असह्यता यामुळे जीव द्यायचा विचार बळावला होता .
अगदी बाजारातून बंदुक विकत घेऊन जीव देण्याचा प्रयत्न होता पण जीव जायची हिंमत झाली नाही शेवटी चालते चालते एका वाचनालय पर्यंत आले असंख्य यश आणि प्रेरणेची ची पुस्तके त्यातली काही घेऊन लेखकाने वाचन चालू केले
हाच त्यांचा आयुष्यातला टर्निंग पाँइंट ठरला आपलं काय चुकलं होतं कसे चुकलं होतं त्या प्रश्नांची उत्तर शोधायचे  काम चालू झालं यशावर 100 च्या वर पुस्तके त्यांनी वाचून काढली पण डब्ल्यू क्लेमेंट स्टोन लेखकांचं  Sucess thru positive Mental attitude पुस्तक वाचून त्यांच्या आयुष्याला खर्या अर्थाने कलाटणी मिळाली.
शहरातील त्यांचीच एका उपकंपनी शोधून लेखक आँग तिथे कामाला लागले.
त्याच दरम्यान स्वतः पेक्षा जास्त विश्वास आँगवर असणारी जीवनसाथी मिळाली
त्यांना जी शाखा मिळाली तिथे त्यांनी उज्ज्वल यश मिळवले, पदोन्नती मिळाली
खेड्यात विमा कसा विकावा हयावर लेखक आँग हयांनी लिहिलेल्या माहिती पुस्तिकेला त्यांच्या मुख्य कार्यालयाने त्यांना अक्षरक्षः डोक्यावर घेतले
त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना विक्री विभागाच्या बुलेटिनवर त्यांना काम करायची संधी मिळाली.
त्यानंतर यशाच्या पायर्या चढतच अनुभव नसतानाही नियतकालिकाचे संपादक बनले, क्लेमेंट स्टोन यांचे मित्र बनले
नियतकालिकांसाठी लेख लिहिता लिहिता 
हया पुस्तकाची कल्पना सुचली 
प्रकाशकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक बनले.

पुस्तकाविषयी:
हया पुस्तकात एका छोट्या इंटरेस्टिंग,वाचनीय कथेच्या माध्यमातून विक्रीकौशल्याची महान दहा तत्त्वे लेखकाने सांगितली आहेत. हसतखेळत ,प्रेरक ,ओघवत्या भाषेत महान विक्रेता आणि चांगला माणूस कसे बनायचे हयाबद्दल अमूल्य मार्गदर्शन केलेय.

हया तत्वांबद्दल जाणून घ्यायला वाट पाहा उद्याच्या भागाची.....
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know