WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Thursday, June 3, 2021

कामाला_लावू_तुमच्या_अर्धसंज्ञ_मनाची_शक्ती भाग 1

#कामाला_लावू_तुमच्या_अर्धसंज्ञ_मनाची_शक्ती 
(Putting the power of your subconscious mind)

 लेखक : जोसेफ मर्फी 
अनुवाद : हेमलता अंतरकर

पुस्तकाविषयी:
संशोधनातून असे आढळलय की बरीच माणसे त्यांच्या करियरबाबत समाधानी नाही .
एकतर त्यांची प्रगती खुंटलीय
किंवा त्यांना जे हवयं ते साध्य करायला त्यांना अपयश येते.
काहीजणांना आत्मविश्वासाची कमी जाणवते तर काहींना आत्मसन्मानाचा अभाव आहे.
काहीजणांकडे ध्येय नाही तर काही जण फक्त स्वप्नाळू आहेत अशा सार्या लोकांसाठी हे पुस्तक अंतर्मनाच्या शक्ती वापरून करियर आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे

#यशस्वी_करियरसाठी_व्यक्तिगत_गुणांचा_वापर
1️⃣ उद्दिष्ट निश्चिती
ज्याला यशस्वी व्हायचे त्याला उद्दिष्टांच्या शिवाय राहता येणार नाही
➖माणसाने आपले शिक्षण, पूर्वानुभव, छंद, आवडीनिवडी, मानसिक क्षमता यांचा धांडोळा घ्यावा. स्वतःचे मूल्यमापन करून 
 आपल्या आवडीच्या स्वप्नाला उद्दिष्ट बनवा ,
➖आपल्या उद्दिष्टावर आपला ठाम विश्वास, निष्ठाआणि पूर्ण बांधिलकी हवी.
त्यासाठी त्यागाची तयारी हवी.
भीती ,अभाव हया भावनांना उद्दिष्टाच्या वाटेतील अडथळे बनवू नका
➖उद्दिष्टाबाबत कायम आशावादी रहा
➖उद्दिष्ट कृतीवर आधारित असावे
➖एकाच उद्दिष्टावर संपूर्ण शक्ती लावून क्षमतांचा स्थिरपणे आणि सातत्यपूर्ण वापर

2️⃣ आत्मविश्वास आणि आत्मसन्मान
आत्मविश्वास म्हणजे आपला स्वतः वर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर ठाम विश्वास
आत्मसन्मान म्हणजे स्वतःबद्दल चा आदर किंवा चांगली भावना
आत्मविश्वासाच्या अभावाची कारणे
1. अपयशाच्या पुनरावृत्तीची भीती
2.न्यूनगंड
3. एखाद्याला अपयश आले की आपल्याला पण अपयशच येईल अशी चुकीची धारणा

आत्मविश्वास वाढवण्यासाठी
1.सकारात्मक विचारांना इच्छाशक्तीचे पाठबळ
2.अंतर्मनाला ठामपणे भावना स्वीकारायला सांगणे
3. स्वतः ला अपयशी ,कमनशिबी समजू नका
4.कुणी तुम्हाला कमी लेखले तरी त्याचा यशस्वी होण्याचा संप्रेरक म्हणून वापरा
5.आपणच आपले नियंत्रक व्हा 
6.अपयशाचे निरपेक्षपणे मूल्यांकन
7.स्वतः वर आणि देवावर ठाम विश्वास

आत्मसन्मान वाढवण्यासाठी
1.स्वतःची समर्थ आणि सकारात्मक आत्मप्रतिमा 
2.स्वतः वर आदर आणि विश्वास 
3.आत्मसंतुष्ट न राहता स्वतः कडून अपेक्षा
4.रोज स्वतः शी  प्रेरक आत्मसंवाद
5.अडथळयांना शिकण्याची प्रगतीची संधी समजा
6.आत्मक्लेश टाळा
7.आपल्या शक्तीस्थानांचा वापर करून प्रवीणता वाढवा आणि कमतरता सुधारा

3️⃣ आधिक सकारात्मक चिंतक बना
नकारात्मकता माणसाच्या जीवनात अनारोग्य, दैन्य,अपयश आकर्षित करतात
आणि पर्यायाने माणूस अपयशी ठरतो.
त्यामुळे सकारात्मक चिंतन करा
1. वाईट,दूषित, विसंवादी, घातक विचारांना मनाच्या वेशीवर रोखा.
2.द्वेष भावना बाळगून दृष्ट होऊ नका
3.प्रत्येकाबद्दल उदात्त ,प्रेमळ वृत्ती बाळगा
4.लोकांना तुमच्या विषयी आदर आणि मैत्रीची भावना विकसित होईल असे वर्तन ठेवा
5.सतत आशावादी दृष्टिकोन 
6.चांगल्या विचारांचे मैत्र बाळगा
7.कल्पनाशक्तीला स्वप्न पाहायला, चांगले आयुष्य जगायला वापरा
8.नकारात्मक विचार मनात आले की त्यांना लगेचच सुधारा

4️⃣ आकर्षक व्यक्तिमत्त्व
व्यक्तीमत्व म्हणजे व्यक्तीशः उत्क्रांत केलेल्या वर्तनाचा गुणविशिष्ट आकृतिबंध
आपले व्यक्तिमत्व आकर्षक करण्यासाठी
1.अदबशीर आणि सृजनशील वागणूक
2.योग्य वेळी योग्य गोष्ट करण्याची क्षमता
3. परिस्थिती जोखण्याची क्षमता
4.काँमन सेन्स, वागण्याबोलण्याची टँक्ट
5.आयुष्याबाबत विस्तृत दृष्टिकोन
6.चांगली अभिरूची,मनाचा मोठेपणा
7. लोकाप्रती सहानुभूती, मदतशीलपणा
8.भावनिक औदार्य
9.दुसऱ्यांना आनंद देण्याची कला
10.ज्ञानातुर आणि महत्वाकांक्षी
11.संयमी,सृजनशील,निस्वार्थपणा,स्थिरमनस्कता,सचोटी
12.उत्तम आरोग्य, शक्ती,जोम
13. चेहऱ्यावर स्मितहास्य
14.स्वच्छ आणि नीटनेटके कपडे
15.लोकांमध्ये मिसळणे,नजरेला नजर भिडवणे
16.अनुभवी सल्लागाराने दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण

5️⃣ आधिक उत्साही बना
आपण जे करतोय ते अर्थपूर्ण ,साध्य असेल तर माणसाच्या चेहऱ्यावर आणि कृतीतून उत्साह दिसून येतो आणि उत्साहाने यशसिद्धी प्राप्त होते
उत्साही बनण्यासाठी
1.जे करतोय त्याची पूर्ण माहिती मिळवा
2.जे करतोय त्यावर ठाम विश्वास
3.थोर पुरूषांच्या चरित्रापासून प्रेरणा
4. आपल्या गुणांना आणि क्षमतांना मुक्त करणे

6️⃣ लवचिकता आणि अनूकूलनक्षमता

लवचिकपणाने आपण आपल्या मनात बदलाची तयारी करतो तर 
लवचिकता वाढवण्यासाठी
1.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असे समजून बदलायची तयारी
2.बिघडलेल्या परिस्थितीत आपले आधिक  चांगले गुण दाखवून भोवतालची परिस्थिती बदला.

अनुकूलनक्षमतेच्या गुणांमुळे आपण प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतो.
अनुकूलनक्षमता वाढवण्यासाठी
1. स्वतः मध्ये सुधारणा करण्याची तयारी
2.सतत ज्ञानात वाढ करून बुद्धिमत्ता वाढ
3. अडथळे आले की आंतरिक शक्ती वाढवा
4.उत्तम संगतीच्या सहाय्याने क्षमतांचा विकास

7️⃣ चिंता व ताणतणावावर मात
निष्क्रियता,आळशीपणा, भावनाशून्यता, निर्विकारपणा हयामुळे चिंता निर्माण होते
आणि त्याच थकवा, नैराश्य, विकार, आजार उद्भवतात
चिंतेवर मात करण्यासाठी
1.समस्येचे मूळ शोधा
2.समस्या वास्तविक आहे का याचे मूल्यमापन करा
3.त्या वास्तविक असल्यास त्यांना सोडवण्यासाठी उपाय शोधा
4.सकारात्मक विधानांची आठवण 
5.देवावर ठाम श्रद्धा
6.आशावादी वृत्ती ठेवा
7.भूतकाळातील आपली यश कौतुक आठवून आपला आत्मविश्वास वाढवा.
8.यशस्वी होण्याचा ठाम निर्धार

8️⃣कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवा
कल्पनाशक्ती ही माणसाला लाभलेली दैवी देणगी आहे ज्याने माणूस विचारांचे प्रतिमात रूपांतर करतो
कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी
1.निरीक्षणशक्तीचा अचूक वापर
1.मानसचित्र व मनोप्रतिमांचा वापर
2.आपल्या आवडीचे काम करत असल्याची जाणीव
3.कृतीची अनुभूती घ्या

सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता 
सर्जनशीलता वाढवण्यासाठी
1.उत्तम निरीक्षण आणि त्यातून जे शिकलो  त्या नियमांचा परिस्थितीवर वापर
2.अस्तित्वात असलेल्या एखाद्या कल्पनेचे रूपांतरण करणे
3.अडचणींना पर्याय शोधणे
4.अनावश्यक काम आणि खर्चावर नियंत्रण आणून उत्पादकता वाढवणे
5.समस्यांवर सर्वोपयोगी समाधान शोधण्याचा प्रयत्न

9️⃣ वाईट सवयी सोडा
सवय म्हणजे एखादे व्यसन, रूढ पद्धत, लकब किंवा स्वभाव जो कायम पाळला जातो
वाईट सवयी सोडण्यासाठी
1.उद्दिष्टप्राप्तीच्या मार्गात अडसर बनणारी वाईट सवय शोधा
2.या सवयीमुळे आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे ते ठरवा
3.सवय सोडण्याची मानसिकता बनवा
4.सवयी मोडण्यासाठी लागणारी साधने आणि मार्ग शोधा
5.समुपदेशकाचा सल्ला घ्या
6.जे अशा सवयी सोडू इच्छितात अशा लोकांच्या गटात सामील व्हा.
7.पद्धतशीर प्रयत्न करून जुन्या वाईट सवयींच्या पँटर्नमधून स्वतःला आधी मुक्त करायचे आणि मग बदल करून नव्या सवयीच्या पँटर्नवर हुकूमत मिळवा.
8.झटपट विजय मिळाला तरी खुश होऊ नका आणि प्रयत्न फसले तरी निराश होऊ नका
9.उद्दिष्ट पूर्ण होईपर्यत प्रयत्न करत राहा
अडथळयांवर मात करत पुढे जात राहा

अपूर्ण

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know