WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Tuesday, May 25, 2021

चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा लेखमाला

#चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा
(How to Stop Worrying and start living )

लेखक - डेल कार्नेगी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

#लेखकाविषयी : 
डेल कार्नेगी एक प्रसिद्ध अमेरिकेन लेखक आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखले जात.
मिसुरी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
घरचे अठराविश्व दारिद्रय ,काबाडकष्ट करुनही कर्जाचा सतत वाढता डोंगर त्यामुळे हौसमौज त्यांनी कधी अशी केलीच नाही.
एकदा वडिलांचा धीर खचला आणि त्यांनी जीव देण्याचा सुद्धा विचार केला होता पण हयाही कठीण परिस्थितीत त्यांच्या आईचा देवावर प्रचंड आणि ठाम विश्वास त्यांना सतत जगण्याची प्रेरणा देत राहिला. 
एका साध्या खोलीतील एकशिक्षकी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले.
लहानपणापासून त्यांना भाषणाची खूप आवड होती.
शालेय शिक्षणानंतर काँलेजचे शिक्षण त्यांनी घरचे शेतीचे काम सांभाळत पूर्ण केले.
त्यानंतर ट्रँव्हलिंग सेल्समन,विक्री अधिकारी अशी कामे सांभाळत असताना अभिनेता व्हायचे खूळ त्यांना शांत बसू देत नव्हते.
तोपर्यंत साठवलेले 500$ घेऊन ते न्यूयॉर्क ला अभिनय शिकायला गेले.लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाला.
अभिनय हे आपले क्षेत्र नाही असा बोध घेऊन ते तिथून बाहेर पडले.
आयुष्यातल्या सगळया स्वप्नांचा चक्काचूर झाला होता 
दिवसभर पुस्तके वाचून व्याख्यानांचा सराव सुरू करायचा आणि 
रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग घेऊन पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असा त्यांचा दिनक्रम बनला.
त्यांनी चालू  केलेल्या रात्रशाळेला हळूहळू उत्तम प्रतिसाद मिळू लागला .त्या वर्गात येणारे बरेचसे स्त्रीपुरुष चिंतेत असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या या विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करण्याचे त्यांनी ठरवले त्यानुसार लायब्ररीत पुस्तके शोधली पण
ती पुस्तक फार तोकडी असल्याचे त्यांना जाणवले . 
त्यातले एकही पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे नव्हते
मग त्यांनी स्वतः या विषयावर संशोधन करायचे ठरवले.त्यानुसार मोठमोठया उद्योगपतींची भेट घेतली, कित्येकांची चरित्र वाचली. त्यांनी चिंतावर कशी मात केली ते जाणून घेतले.
मग तीच तत्वे विद्यार्थ्यांना अवलंबायला सांगून त्याचा काय फायदा होते हे अनुभवले.
कित्येक लोकांनी त्यांचे जीवनाअनुभव डेल कार्नेजी हयांच्याकडे शेअर केले.
अशा रीतीने सलग पाच वर्षाच्या विचारमंथनातून पुस्तकाचा जन्म झाला ते म्हणजे " चिंता सोडा आणि सुखाने जगा"

#पुस्तकाविषयी : 
हया पुस्तकातून लेखकाने चिंता , काळजीचा जन्म कसा होतो
ते कसे फोफावतात ,माणसांना आतून कसे पोखरून काढतात हयाविषयी मार्गदर्शन केलेच आहे त्याचबरोबरीने नकारात्मक भावना, चुकीच्या धारणा आणि पूर्वग्रह आपल्या शरीरात आजारांना कसे आमंत्रण देतात याचेही सुंदर वर्णन समर्पक अनुभव कथांच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात.
लेखक एवढ्यावरच थांबले नाही तर वास्तविक जीवनात चिंतेला रोखण्याचे विविध उपाय आणि त्यांची अंमलबजावणी हयाबाबत आग्रही सूचना ते करतात.
हया पुस्तकात आपल्याला आपला रागावर नियंत्रण आणि तो नसेल तर काय भोगावे लागते हयावर भाष्य केलयं
टीका, ट्रोल हा आजचा ट्रेंड होऊ पाहतोय त्याकडे आपण लेखकाच्या नजरेतून पाहता येते.
स्वतः कडे सकारात्मक नजरेने पाहायची दृष्टी हे पुस्तक वाचकांना देते.
स्वतः ला न थकवता आणि आपली दमणूक न करता कामाचे आणि वेळेचे नियोजन कसे करायचे याबाबत लेखकाने सुरेख मार्गदर्शन केले आहे.
आजपासून पुढील काही दिवस आपण पुस्तकातील महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपण येथे बोलणार आहोत.

Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know