WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Tuesday, May 25, 2021

लेखमाला भाग 4

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड 
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                    प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग चौथा

#अंतर्मन_आणि_धनसंपत्ती

भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला त्याची भौतिक, आध्यात्मिक, मानसिक प्रगती करण्याचा पूर्ण अधिकार आहे.त्यामुळे भिकेचे डोहाळे लावून घेण्याची गरज नाही तर धन संपत्ती यश ऐश्वर्य यांच्याशी मैत्री करायची गरज आहे
श्रीमंत होण्याची इच्छा म्हणजेच एक संपूर्ण आनंदी अद्भुत जीवन जगण्याची इच्छा

तुम्हाला धनवान श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात 1️⃣आधी मन साफ करा ,मनातले खालील गैरसमज काढून टाका
➡️श्रीमंत होण्यासाठी खूप काबाडकष्ट करावे लागतात 
➡️श्रीमंत होण्यासाठी लांडयालबाड्या कराव्या लागतात, 
➡️श्रीमंत लोक वाईट असतात
➡️ पैसाही भगवान है ,सबकुछ पैसेसे खरीद सकते है
➡️ गरीब लोक म्हणजे सद्गुणी माणसे
➡️ पैसा म्हणजे दुर्गुणांची खाण

2️⃣ सकारात्मक विधानांचा वापर
रोज स्वतः शी खालील सकारात्मक स्वसंवाद म्हणा आणि संपत्ती वृद्धिंगत करा.
"रात्रंदिवस मी माझ्या आवडीच्या, रूचीच्या बाबत समृद्ध होत आहे.
"मला पैसा आवडतो,मी पैशावर प्रेम करतो
मी पैशाचा वापर सर्जनशीलतेने , शहाणपणाने, न्यायपूर्णपणे करतो. लक्ष्मीचा प्रवाह अविरत वाहत आहे,
माझी संपत्ती दिवसेंदिवस वाढत आहे 
माझ्या संपत्तीचा आणि मनाच्या समृद्धीचा मी अत्यंत ऋणी आहे  "

जर गुंतवणूकीबाबत साशंक असाल तर सकारात्मक विधान म्हणा
" अमर्याद बुद्धिमत्ता माझ्या सगळया व्यवहारांवर लक्ष ठेवत आहे.मी जे काही करेन त्यामुळे भरभराटच होईल "

खरेदी-विक्री व्यवहारात यश होण्यासाठी सकारात्मक विधान
"माझ्या  अंतर्मनाची प्रज्ञा अमर्याद परमज्ञानी आहे, ती मला आवश्यकतेनुसार मदत करत आहे, माझ्या विनंतीला अनुसरून प्रतिसाद देत आहे"

यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विधान
"माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा माझ्या जीवनातील कार्य स्पष्ट करून दाखवत आहे"

हया सकारात्मक विधानांमुळे इच्छा आणि कल्पना हयातीत संघर्ष संपेल. संपत्ती बद्दल प्रबळ आणि शक्तीशाली कल्पना मनात निर्माण होईल जी अंतर्मनात सहज पोहचेल.आणि सकारात्मक मानसिकतेमुळे संपत्ती आकर्षित व्हायला अंतर्मन योग्य मार्गदर्शन करेल.

संपत्ती आकर्षित करण्याच्या मार्गातील अडथळे
 1.सकारात्मक विधानानंतर पुढच्या दहा मिनिटात भीती आणि नकारात्मक विचार येत असतील तर सकारात्मक विधान अमान्य होतो त्यामुळे नकारात्मक विचार मनात आले तरी त्याला लगेच थांबवा. 
2.कुणाबद्दल नकारात्मक भावना अर्थात टीका, निंदा, इर्ष्या, हेवा नकोत
3.दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना त्याला आणखी संपत्तीवैभव मिळू देत अशी कामना करा त्यानेही चक्रवाढ पद्धतीने तुमची संपत्ती वाढेल.
4.जर एखादा अप्रामाणिक मार्गाने संपत्ती गोळा करत असेल तर त्याला त्याचे कर्मफळ मिळेल तुम्ही त्यावर टीका,चिंता करणे सोडा
5.लबाडी करून कितीही पैसा कमावला तरीही माणसाला उणीवेची जाणीव मनात असते. तसेच तो भीती आणि अपराधभावनेत जगत असतो त्याच भावना पुढे ह्दयविकार , कँन्सर सारख्या आजारांना आकर्षित करून घेतात
6.काही न देता काही मिळत नाही
अकर्मणी राहू नका,सतत प्रयत्न करत राहा ,कुठे अडत असाल तर अंतर्मनाला मार्गदर्शनासाठी साद घाला .
7. जीवनात यशस्वी व्हायचे असेल आपल्या आवडीच्या गोष्टीत करिअर करा . त्या कामावर प्रेम करा,त्यातले तज्ञ व्हा आणि जगाच्या भल्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करा
कारण यश म्हणजे शांतीपूर्ण, आनंदी, सुखी दीर्घायुष्य जगणे असते

Source :- Nilesh Shinde

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know