WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Saturday, May 15, 2021

लेखमाला भाग 1

#द_मँजिक_आँफ_थिंकीग_बिग
लेखक - डॉ. डेव्हिड जोसेफ श्‍वार्त्झ
अनुवाद - प्रशांत तळणीकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस

लेखमाला - भाग १

लेखकाविषयी 
डेव्हिड जोसेफ श्‍वार्त्झ हे एक अमेरिकन लेखक आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखले जात. 
इंडियाना मध्ये एकशिक्षकी शाळापासून सुरू झालेला त्यांच्या जीवनप्रवास शेवटी स्वतःच्या कंपनीचे मालक यावर जाऊन थांबला.
आपल्या आयुष्यात त्यांनी तीन हजारांहून आधिक कंपन्यांच्या लाखो कर्मचाऱ्यांना समाधान आणि मनशांती न गमावता अधिक चांगली विक्री , अधिक चांगलं व्यवस्थापन, अधिक पैसा कमवण्यासाठी मार्गदर्शन केल.
त्यांनी याच निरीक्षणातून लिहिलेल्या द  मँजिक आँफ थिंकीग बिग हया पुस्तकाच्या जगभरात 60 लाखाहून जास्त प्रती खपल्यात.
 'द मॅजिक ऑफ थिंकींग बिग'  पुस्तक व्यवहार्य, प्रत्यक्ष करून पाहण्याजोग्या पद्धतीवर भर देऊन विचाराच्या भव्यतेने 
 नोकरी ,उद्योग, कौटुंबिक सामाजिक जीवन समाधानाने आणि उत्कृष्ट जगण्याचा एक सुनियोजित कार्यक्रमच आहे 
 
लेखकाच्या मते आपला आनंद समाधान आणि बँक बँलन्स हा आपल्या विचारांवर अवलंबून असतो 
आपण खुजे बनतो आपल्या संकुचित विचारांमुळे आणि आपले विचार संकुचित बनतात ते आपल्या सभोवतालच्या वातावरणामुळे आणि आपल्या मनातील नकारात्मक धारणांमुळे.

हया नकारात्मक धारणा बदलण्यासाठी
 1️⃣ #यशस्वी_होण्याचा_विश्वास
आपण यशस्वी होणारच असा ठाम विश्वास मनात रूजवण्यासाठी
➖यशस्वी लोकांचा आदर, त्यांच्या निरीक्षणात्मक अभ्यास आणि तिच्यापेक्षाही यशस्वी होण्याचा विचार
➖स्वतःला कमी न समजणे
➖डोळ्यासमोर मोठी उद्दिष्ट ठेवणे
➖स्वयंविकासाचा निश्चित कार्यक्रम राबवून स्वतःच्या क्षमतांचा विकास

2️⃣ #कारणेरियापासून_मुक्ती
अपयशी लोक कारणे /स्पष्टीकरण देण्यात तत्पर असतात.त्यातील चार महत्त्वाचे प्रकार खालीलप्रमाणे

▪️#आरोग्य
तब्येत बरी नाही , त्रास होतोय, मनोनिर्मित आजार ते आरोग्याकडे पाहायचा चुकीचा दृष्टिकोन 
आरोग्याच्या कारणेरियावर उपाय
➖आरोग्याबद्दल चर्चा करणं सोडा
➖आरोग्याची विनाकारण चिंता करणं सोडा

▪️बुद्धिमत्ता
जगातील 95% लोक स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी बुद्धी असल्याचे समजतात 
पण आपली बुद्धी कमी असो किंवा जास्त...आपण तिचा वापर कसा करतो हयाला जास्त महत्त्व आहे
बुद्धिमत्तेच्या कारणेरियावर उपाय
➖स्वतःच्या बुद्धीला कमी समजू नका
➖ स्वतः ची विशेष कौशल्य शोधा
➖ बुद्धिमत्तेपेक्षा मानसिकता महत्त्वाची
➖ पाठांतरापेक्षा समजून घ्यायला भर
➖ यशस्वी होण्यासाठीची कारणं शोधा

▪️ वय
माझे वय खूप झालयं किंवा मी अजूनही लहान आहे अशी कारणं दिल्याने आपण कितीतरी संधी गमावतो
वयाच्या कारणेरियावर उपाय
➖वयाला अडथळा मानण्याऐवजी संधी समजा
➖वय काहीही असो आशावाद महत्त्वाचा
➖मनापासून आवडणारे काम करा
➖कामाचे सुयोग्य ज्ञान आणि लोकांना समजून घ्यायचा समर्थ दृष्टिकोन वयापेक्षा जास्त महत्त्वाचा  
➖ मन तरूण असेल तर वय अडचण नाही
➖वयाच्या सत्तरीपर्यंत माणूस कार्यक्षम असतो त्यामुळे तोवर संधी आहे असे समजणे

▪️नशीब
माझे नशीबच फुटके असा चुकीचा विचार करण्यामुळे आपल्या हातून झालेल्या चुकांकडे आपला फोकस जात नाही
नशिबाच्या कारणेरियावर उपाय
➖ कार्यकारणभाव समजून घ्या
कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही
आलेले अपयश हे आपल्या पूर्वतयारी नियोजन , कृती , विचार हया कुठल्यातरी टप्प्यावर झालेल्या चुकांमुळे आहे नशीबामुळे नाही
➖फक्त नशीब आहे म्हणून कुणी प्रयत्नांशिवाय यशस्वी होत नाही.

3️⃣ #भीती
भीतीचे मुख्य कारण नकारात्मक कल्पना असतात उदा.रंगरुपाची लाज, अपयश, भयावह परिस्थिती,लोकापवाद,पैसे गमावण्याची भीती, लोकांची भीती
हया सार्या भीती माणसाला आजारी पाडू शकतात , भीतीमुळे माणसं संधीचा फायदा घ्यायला कचरतात. 
भीती भेडसावू लागली की आधी मन शांत करून भीतीचे कारण शोधायचे एकदा का ते समजले की त्यानुसार योग्य कृती केली तर भीती पळून जाते
वेगवेगळ्या भीती घालवण्यासाठी
➖ सुंदर दिसा आणि चांगले कपडे घाला
➖ स्वतःच्या कौशल्यांना वाव द्या
➖ स्वतःचे काम चांगल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
➖ ईश्वराची प्रार्थना आणि ध्यानधारणा
➖ स्वतः योग्य असताना लोकांच्या टीकेला न जुमानणे
➖कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सर्वांगीण विचार

4️⃣ #आत्मविश्वासाची_कमी
कमी आत्मविश्वास हा बहुतांशी स्मरणशक्तीच्या गोंधळामुळे जाणवतो
त्यामुळे स्मरणपेढीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी
➖फक्त सकारात्मक विचार जमा करा
➖रोज झोपण्यापूर्वी चांगल्या गोष्टी आठवा आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगा
➖छोट्याछोठ्या विजयांचे सिद्धींचे स्मरण 
➖नकारात्मक विचारांना खतपाणी न घालणे
➖प्रत्येक प्रसंगातील वाईट भाग विसरा
चुकून विचार आला तरी तो झटकून दुसरा विचार करणं
➖कटू आठवणी कायमच्या विसरा

5️⃣ #भिडस्तपणा
समोरच्या माणसाला योग्य परिमाणात फिट न करता आल्यामुळे त्याची भीती वाटते त्यामुळे त्याला आपल्यासारखा माणूस समजा, माणसाचा स्वभाव जाणून त्यानुसार वागा
आपला अंगभूत भिडस्तपणा घालवण्यासाठी
➖कुठल्याही कार्यक्रमात पुढच्या रांगेत बसा
➖स्वतःला दुबळे समजू नका
डोळयाला डोळे भिडवून बोला
➖सभा,संमेलन चर्चासत्रे यात उत्सफूर्तपणे बोलणारे प्रथम नागरिक व्हा
➖ सभा गाजवण्याचे प्रशिक्षण घ्या
➖ मोठे स्माईल करा आणि सुरुवात करा.

अपूर्ण


Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know